• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंत्र्यांच्या मुलांना हेच खायला देता का? अभिजीत दिपके यांचा संताप, शाळेत मुदत संपलेले मसाले..

August 30, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपके यांनी आपला मोर्चा जिल्हा परिषदेच्या शाळेंकडे वळवला आहे. हिंगोली जिल्हातील शाळेंची पाहणी करण्यासाठी अभिजीत दिपके पोहोचले होते. यादरम्यान दिपके यांनी मोठा दावा केला. एक्सपायर्ड झालेले पॅकेटचे खाणे विद्यार्थ्यांना दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला. यासोबतच पिण्यासाठी चांगले पाणी नाही. बाथरूममध्ये पाणी नाही. अभिजीत दिपके यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, फेब्रुवारीमध्ये एक्सपायर झालेले खाणे विद्यार्थ्यांना आतापर्यंत खाऊ घातले जात आहे. मंत्र्यांच्या लेकरांना असे एक्सपार झालेले खाऊ घातले जाईल का? यासोबतच पिण्याच्या पाण्याच्या टाकीबद्दलही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. अभिजीत दिपके यांनी शाळेची पूर्ण पाहणी केली.

यादरम्यान अभिजीत दिपके यांनी संबंधित अधिकाऱ्याला फोन करत सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी एक्सपायरी झालेले अन्न विद्यार्थ्यांना खाऊ घातले जात आहे. शाळेत फिल्टर नाही. बोरचे पाणी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आहे. हेच नाही तर शाळेच्या बाथरूममध्ये पाणी नाही. यासोबतच त्यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांसोबत चुकीचा व्यवहार केला जात आहे.

87 विद्यार्थ्यांसाठी दोनच खोल्या असल्याचे म्हटले. सरकारी शाळेच्या मुद्द्यावर आवाज उठवताना अभिजीत दिपके दिसत आहेत. अभिजीत दिपके यांच्याकडून गंभीर आरोप केली जात आहेत. हिंगोली जिल्हातील वेगवेगळ्या शाळेंची पाहणी करताना अभिजीत दिपके हे दिसत आहेत. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाही अभिजीत दिपके दिसले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन अभिजीत दिपके यांनी केले.

दिल्लीतील जंतर मंतरवर हे आंदोलन झाले. देशभरातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. यासोबतच विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरताना दिसले. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला इतके जास्त यश मिळाले की, देशभरातून प्रतिसाद मिळाला. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला. ज्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. जेंनझींनी आपली ताकद सरकारला दाखवली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा भाजपासाठी मोठा झटका होता.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप, त्या युक्तीवादाने प्रकरणाला मोठी कलाटणी?
  • Nagpur Accident : नागपुरात अपघाताचा थरार, मॉर्निंग वॉक करणाऱ्यावर काळाचा घाला; पादचाऱ्याचा कारखाली चिरडून मृत्यू
  • Shabana Azmi: आमच्यात खूप भांडणं.., जावेद अख्तर यांच्यासोबतच्या वैवाहिक आयुष्याबद्दल शबाना आझमी स्पष्टच बोलल्या
  • ठाणे मॅरेथॉनमध्ये धावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे..
  • दहशतवाद्याने बँक खाते वापरले; 12 दिवस हाउस अरेस्ट, नाशिकमधील व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in