• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल, थेट रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत आक्षेपार्ह भाषेचा..

July 30, 2026 by admin Leave a Comment


भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचे दिसत आहे. कथित संभाषणामुळे भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आलीत. या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण ही ऑडिओ क्लिप आता चर्चेचा विषय ठरला. गिरीश महाजन यांच्या निशाण्यावर पुन्हा एकदा खडसे कुटुंबिय असल्याचे यावरून स्पष्ट दिसतंय. कथित क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले. यावरून दिसतंय की, महाजन आणि खडसे यांच्यातील संघर्ष संपला नाही.

या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. खडसे हे भाजपवर टीका करतात, मग त्यांच्या सुनेला मंत्रिपद क? असाही सवाल यादरम्यान उपस्थित करण्यात आला. क्लिपमध्ये विजय चाैधरी रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. भाजपा नेते विजय चाैधरी ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना म्हणत आहे की, एकनाथ खडसे असतील त्यांची मुलगी असेल नेहमीच भाजपावर टीका करत राहतात

आणि आपण रक्षा खडसेला मंत्री बनून ठेवले आहे. मग हिला काढले पाहिजे… हे कुठेतरी थांबले पाहिजे ना… उठले सुटले घाणेरडे काहीही आरोप करतो…******** काहीतरी निर्णय करावा लागेल. रक्षा खडसे मंत्रिमंडळात आहेत. एकाच घरात राहतात एकमेकांना मदत करतात.. यादरम्यान मंत्री गिरीश महाजन हम्म… हम्म… हम्म… म्हणताना दिसत आहेत. पुढेल विजय चाैधरी यांनी म्हटले की, हे कसे सहन करायचे आपण? याला गिरीश महाजन यांनी म्हटले की, बरोबर आहे..

विजय चाैधरी यांनी म्हटले की, तुम्ही सांगा काय करायचे. प्रत्येक वेळेस काहीही झाले तरीही तुमच्यावर येतो दादा… ******** देणे आणि घेण्याचे काहीही त्यात तथ्य नसते. आपण काहीतरी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला सांगितले पाहिजे, असे चालणार नाही आणि दुहेरी भूमिका चालणार नाही. एकदर रक्षाने राजीनामा द्यावा हे फालतूपणा चालणार नाही. भाऊ.. सगळे एका घरात खडसेही मुलगीही पण..

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in