• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मंचुरियनमध्ये आढळली पाल, तरुणीची तब्येत बिघडली..

June 20, 2026 by admin Leave a Comment


उल्हासनगरात एक भयंकर घटना घडली आहे. एका चायनीज दुकानातून आणलेले चायनीज मंच्युरियन खात असताना एका तरुणीला त्यात चक्क पालीचे मेलेले पिल्लु आढळल्याची विचित्र प्रकार घडला आहे. यामुळे या तरुणीला उलट्या आणि मळमळ झाल्याची तिची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुकानादारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात मोना पठारे ही तरुणी तिच्या कुटुंबासह रहाते. सायंकाळच्या सुमारास तिने सुभाष टेकडी मच्छी मार्केट परिसरातील मोरे चायनीज भेळ वाल्याकडून मंच्युरियन घरी आणले होते. हे मंचुरियन खात असतानाच तिने चटणी घेतली तर त्यात पालीचं मेलेलं पिल्लू असल्याचं तिला आढळले. त्यामुळे तिने मंच्युरियन वाल्याला जाऊन सांगितले. त्यावेळी या मंच्युरियन वाल्याने ही चटणी टेस्टिंगसाठी पाठवतो, पण तू ही गोष्ट कोणाला सांगू नको असे तिला समजावले. यानंतर रात्री या तरुणीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून अशाप्रकारे निष्काळजीपणा करून ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या चायनीज भेळ आणि मंचुरियन विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

खाद्यपदार्थातील अस्वच्छता

मुंबईत मागे ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचा तुकडा आढळला होता. तर काही महिन्यापूर्वी अन्नपदार्था मेलेला उंदीर सापडल्याची घटना घडली होती. रेल्वे प्रवासात देत असलेल्या अन्नपदार्थात अनेकदा अळ्या सापडल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या भेसळीचा मुद्दा आणि त्यावरील कारवाई एकीकडे गाजत असताना आता रस्त्याच्या कडेला असलेल्या फेरीवाल्यांकडून नियमांची कशी मोडतोड करीत नागरिकांच्या आयुष्याशी कसे खेळले जात आहे याची उदाहरणे दर काही दिवसांनी उघड होत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?
  • CJP आंदोलनात बेधडक पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रियाचं भवितव्य जनतेच्या हातात, सलमान खानने घेतला पुढाकार
  • मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
  • साखर कडू झाल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर दुप्पट, तर लसूण 200 रुपयांवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in