• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारत पाकिस्तान सीमेवर मोठा स्फोट, नियंत्रण रेषेजवळ खळबळजनक घटना, थेट 2 भारतीय जवान..

August 6, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि पाकिस्तान यांच्यात कायमच तणाव राहिला आहे. त्यामध्येच पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणल्या जातात. सीमेवर भारताचे बारीक लक्ष असते. पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी केली जाते.  यादरम्यानच पुंछमधील मेंढर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एक धक्कादायक घटना घडली. मोठा स्फोट तिथे झाला. लँडमाइन निकामी करत असताना झालेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान जखमी झाले. त्या दोघांनाही लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  पाकिस्तानकडून सीमेवर मोठ्या प्रमाणात काड्या केल्या जातात. भारतीय लष्कराची मोठी गस्ती सीमेवर असते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराचे बॉम्ब निकामी करणारे पथक नियमित गस्तीवर होते. ज्यावेळी त्यांना कांगा गली भागात लँडमाइन (जमिनीखालील सुरुंग) दिसून आले.

पथकाने लगेचच हे निकामी करण्याचे काम सुरू केले. हे लँडमाइन निकामी करण्याचे काम सुरू असतानाच त्याचा मोठा स्फोट झाला. सीमेच्या अत्यंत जवळ हा स्फोट झाला. घुसखोरी रोखण्यासाठी नियंत्रण रेषे लगतच्या भागात लँडमाइन्स पेरल्या जातात. सततच्या पावसामुळे या सुरुंगांची जागा अनेकदा बदलते आणि त्यांना वेळोवेळी निकामी करणे आवश्यक असते.

तेच करण्याचे काम सुरू होते. मात्र, यादरम्यानच स्फोट झाला. पुंछमधील नलवा-देगवार तरवान भागात कामगारांना एक संशयास्पद आणि गंजलेले स्फोटक आढळले. त्यानंतर  लष्कराने घटनास्थळी पोहोचून ते नष्ट केले. सीमेजवळ हा मोठा स्फोट झाल्याने नक्की काय झाले, यावरून गोंधळ उडाला. जम्मू काश्मीरमधील संवेदनशील भाग म्हणून पुंछकडे बघितले जाते. मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून या भागात घुसखोरी होते.

अवैध प्रकारे शस्त्र देखील पाठवली जातात. मागील काही वर्षात भारताने सीमेवर सुरक्षा अधिक वाढवली आहे. ज्यामुळे पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यासाठी विविध प्रयत्न केली जात आहेत. पहलगाममध्ये मोठा हल्ला पर्यटकांवर पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी केला. त्यावेळी फक्त हिंदू लोकांनाच टार्गेट करण्यात आले. त्यानंतर भारताने पाकिस्तानची पार वाट लावली होती. पाकिस्तानला सळो की पळो करून भारताने सोडले. भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..
  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in