• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘भारत जोडो’च्या धरतीवर अभिजीत दिपके यांची मोठी घोषणा, सप्टेंबरमध्येच..

August 6, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनचा पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अध्यक्षेखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवस सीजेपीची बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. याच बैठकीत पक्षाची ध्येय ठरणार होते. आता पुढे कॉकरोच जनता पार्टीचे काय होणार हे नुकताच अभिजीत दिपके यांनी सांगितले. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, 25 जुलैला या देशाच्या तरुणांनी हे करून दाखवलं ते बारा वर्षात कोणालाही करता आलं नाही. जे सरकार म्हणत होती या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत ते करून दाखवला आहे. फक्त राजीनामा ठेवून दाखवला नाही तर सरकारला झुकवला आहे राजीनामा घ्यायला भाग पाडला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा आमचा सगळ्यात मोठा विजय होता. या सरकारने मागच्या दहा-बारा वर्षे दडपशाही भीती निर्माण केली होती ती भीती आता संपली आहे.

पुढे अभिजीत दिपके यांनी म्हटले की, सप्टेंबर महिन्यात पक्षाचे सर्वकाही ठरेल. आता देशाचे नागरिक रस्त्यावर येतील आता एकाचा राजीनामा मागितला. उद्या दुसऱ्याचा सुद्धा. CJP नेमकी काय आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल यांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्यांच्या विचारावर चालणारे ही पार्टी असणार आहे. देशभरातील लोकांसोबत अभिजीत दिपके संवाद साधणार आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडोप्रमाणेच.

अभिजीत दिपके यांनी पुढे म्हटले की, जी संविधानाचे विचारधार आहे तीच आमचे विचारधारा आहे. आम्ही शकूलर आहोत लोकशाहीवर भरोसा ठेवतोय. येणाऱ्या डिसेंबर महिन्यात आम्ही देशभरात कॅम्पिंग करणार आहे त्याचं नाव असेल क्या बोलती पब्लिक … आम्ही देशभरात दौरा करणार आहे, त्यांच्या समस्या अडचणी समजून घेणार आहे.

शिक्षण बेरोजगारी याबद्दल कोणी बोलत नाही, संसदेत कोणी बोलत नाही. सरकार तर असं वाटते की हा काही मुद्दा नाही सरकार फक्त एकच मुदत असते हिंदू मुसलमान. शिक्षणाची वाईट अवस्था यावर कोणी बोलायला तयार नाही. आम्ही लोकांमध्ये जाणार आहे लोकांच्या समस्या अपेक्षा समजून घेणार आहे. अभिजीत दिपके यांनी मोठी घोषणा केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in