• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतीय महिला संघाला दुहेरी धक्का, जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि एशियन्स गेम्समधून आऊट

August 14, 2026 by admin Leave a Comment

आशिया कप आणि एशियन्स गेम्स स्पर्धेआधीच वुमन्स टिमला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. स्टार खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स या दोन्ही स्पर्धांना मुकली आहे. इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेदरम्यान जेमिमाला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत क्रीडाप्रेमींना साशंकता होता. आशिया कप स्पर्धा समोर असल्याने बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये जेमिमाची तपासणी केली. तपासणीत तिच्या हॅमस्ट्रिंगला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले. आशिया कप स्पर्धेपूर्वी जेमिमाचं दुखापतीतून सावरणं कठीण होतं, त्यामुळे बीसीसीआयने तिला स्पर्धेतून वगळलं आहे. बीसीसीआयने एक निवेदन जाहीर करत स्पष्ट केलं की,जेमिमाच्या जागी प्रतिका रावल ही आशिया कप स्पर्धेत खेळेल. इतकंच काय तर एशियन्स गेम्स स्पर्धेतही खेळणार नाही.

प्रतिका रावल टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणार!

जेमिमा रॉड्रिग्सच्या जागी संघात निवड झालेली ओपनर प्रतिका रावल हीने अद्याप एकही टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. इतकंच काय तर वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतही खेळली नव्हती. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रतिका रावल आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत खेळली होती. पण उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यापूर्वी तिला दुखापत झाली आणि स्पर्धेतून आऊट झाली. तिच्या जागी तेव्हा शफाली वर्माची वर्णी लागली होती.

A look at #TeamIndia‘s squad for the upcoming ACC Women’s Asia Cup 2026 #ACC | #WomensAsiaCup2026 pic.twitter.com/a7fVxTjMMI

— BCCI Women (@BCCIWomen) August 14, 2026

आशिया कप स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 30 ऑगस्टला थायलँडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 3 सप्टेंबरला हाँगकाँग आणि 5 सप्टेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी लढत होणार आहे.

वुमन्स आशिया कप स्पर्धेसाठी अपडेटेड संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, भारती फुलमाली, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कामलिनी, अरुंधती रेड्डी, प्रेमा रावत, राधा यादव, श्री चरणी, रेणुका ठाकुर, नंदनी शर्मा, क्रांती गौड, प्रतिका रावल

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in