• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताला ज्याची भीती तेच काम नेपाळने केले, वाद पेटणार, नेपाळचे परराष्ट्र मंत्री थेट चीनच्या..

June 16, 2026 by admin Leave a Comment


मागील काही दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध तणावात आहेत. सीमेचा वाद पुन्हा एकदा पुढे आला. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल भारत दाैऱ्यानंतर चीन दाैऱ्यावर पोहोचले आहेत. यादरम्यान नेपाळ आणि चीन यांच्यातील सीमा वादावर चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून नेपाळचे पीएम बालेंद्र शाह भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमेच्या वादाच्या मुद्द्यात युकेने मध्यस्थी करावी, अशी मागणी करत आहेत. याला भारताने विरोध दर्शवला. या मुद्द्यात कोणाचीही मध्यस्थी सहन करणार नसल्याचे भारताने स्पष्ट बोलून दाखवले. नेपाळचे परराष्ट्र मंत्री यांनी चीनचे टॉप डिप्लोमॅट वांग सी यांच्यासोबत भेट घेतली. यादरम्यान वांग यांनी सांगितले की, बाजूच्या देशांच्या विचार केला तर चीन कायम नेपाळला पुढे ठेवतो. चीन नेपाळची संप्रभुता आणि अखंडता कायम ठेवण्याकरिता पूर्ण समर्थन देते.

भारतामुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेला एकप्रकारची मदत मिळते. भारत आणि नेपाळ यांच्यात 1088 किलोमीटर सीमेवरील वाद सुरू आहे. पण हा वाद काही आजचा नाहीये. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून हा वाद आहे. सर्वात चांगली गोष्टी म्हणजे वाद असतानाही इथे कोणत्याही प्रकारची हिंसा कधी झाली नाही. खनाल गेल्याच महिन्यात दिल्लीला पोहोचले होते.

भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध अधिक मजबूत करण्यावर यादरम्यान त्यांनी भाष्य केले. नेपाळ चीनच्या प्रोजेक्ट 2017 मध्ये दाखल झाला. नव्या सरकारने त्यांची रणनीती अजूनही स्पष्ट केली नाही. वांग यांनी नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांना वादा केला की, नेपाळमध्ये वीज उत्पादन, रस्ते निर्माण, बंदर निर्माण करण्यासाठी पूर्ण मदत केली जाईल. नेपाळ आणि चीन यांच्यातील वाढती मैत्री भारतासाठी कधीही धोका निर्माण करू शकते.

नेपाळमधील नवे सरकार बऱ्यापैकी भारताविरोधात भूमिका घेताना नक्कीच दिसत आहे. आता त्यांनी सीमावादाचा मुद्दा पुढे काढला. काही दिवसांपूर्वीच भारताच्या सीमेबद्दल नेपाळ सरकारकडून मोठा दावा करण्यात आला होता. त्यामध्येच आता चीनसोबत जवळीकता अधिक वाढताना दिसत आहे. भारत यासर्व गोष्टींवर बारीक नजर ठेऊन आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in