• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतामधील कोणतं राज्य सर्वात स्वस्त मजूर पुरवतं? कुठे आहे सर्वाधिक बेरोजगारी? उत्तर ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही

May 2, 2026 by admin Leave a Comment


काल एक मे होता, एक मे हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तर एक मे हा कामगार दिन देखील आहे. वर्षभर राब राब राबणाऱ्या श्रमिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभरात हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व कामगारांना सुट्टी दिली जाते. मात्र यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये वाढत असलेली बेरोजगारी आणि कामगारांचे सुरू असलेले हाल यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारचं नाव बदलून आता श्रमिक प्रदेश करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. तेजस्वी यादव यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा देशभरातील स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या मजुरांचा तसेच बेरोजगार तरुणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सगळ्या स्वस्त मजूर कोणत्या राज्यात?

एका रिपोर्टनुसार देशात सर्वात स्वस्त मजुरांबाबत बोलायचं झाल्यास मध्य प्रदेश, गुजरात, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरामध्ये भारातामधील सर्वात स्वस्त मजूर मिळतात. या राज्यांमध्ये ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत खूपच कमी मजुरी मिळते. या राज्यातील मजूर प्रचंड मेहनत करतात, परंतु त्यांना अपेक्षित मोबदला भेटत नाही. देशात सर्वात स्वस्त मजूर कुठे भेटत असतील तर ते म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सर्वात कमी मजुरीच्या यादीमध्ये मध्य प्रदेशचा देशात पहिला क्रमांक लागतो. इथे मजुरांना दिवस भर काम केल्यावर अवघे 246.3 रुपये एवढाच मोबदला मिळतो.

याशिवाय गुजरात आणि त्रिपुरामध्ये देखील मजुरांना अत्यल्प मजुरी मिळते. पूर्वोत्तर राज्यांची देखील तीच स्थिती आहे. नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये देखील मजुरांचे हाल सुरू आहेत, या राज्यात देखील मजुरांना खूपच कमी मोबदला मिळतो. तर देशात सर्वाधिक बेरोजगारी लक्षद्वीपमध्ये आहे, तर त्याच्यापाठोपाठ केरळचा नंबर लागतो. केरळमध्ये देखील बेरोजगारीचा दर प्रचंड मोठा आहे. केरळमधील अनेक लोक रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात किंवा देशात स्थलांतर करतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Explainer : होर्मुझ बंद, मग आखाती देशांकडे तेलवाहतुकीचे पर्याय काय? 2 प्लॅन बी सोडवू शकतात अडचण; वाचा नेमकं कसं?
  • मोठी बातमी! मतदानात हेराफेरी… आता 21 मे रोजी पुन्हा निवडणूक, बंगालमधील या जागेबाबत मोठी घोषणा
  • शेअर्सना पडले मागे, Gold ETF गुंतवणुकीने यावर्षी मारली बाजी
  • CSK vs MI : मुंबईच्या फक्त 159 धावा, पलटण चेन्नई सुपर किंग्सला रोखणार?
  • GK : माशांना कान असतात का? 99 टक्के लोकांना माहितीच नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in