• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारतात 30 जूनला लाँच होणार वनप्लस एन6, जाणून घ्या डिस्प्ले आणि कॅमेरा फिचर्स

June 27, 2026 by admin Leave a Comment


वनप्लस एन6 भारतात जून महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 जून रोजी लाँच होणार आहे. तर वनप्लस चा हा नवीन फोन कंपनीच्या स्मार्टफोन लाइनअपमधील सर्वात स्वस्त मॉडेल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच लाँचच्या आधीच फोनच्या मायक्रोसाइटवर त्याच्या डिस्प्ले आणि कॅमेऱ्याच्या डिटेल्ससह अनेक माहिती समोर आली आहे. कंपनीने अलीकडेच खुलासा केला आहे की, आगामी स्मार्टफोनमध्ये वनप्लस नॉर्ड सीई 6 प्रमाणेच बॅटरी असेल. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच डिस्प्ले कटआउट असेल. चला तर मग आजच्या लेखात आपण वनप्लस एन6 या फोनचा डिस्प्ले आणि कॅमेरा फिचर्सबद्दल‍ अधिक जाणून घेऊयात.

वनप्लस एन6 चे लीक झालेले फिचर्स

मायक्रोसाइट अपडेट करण्यात आली असून त्यावरून असे उघड झाले आहे की, वनप्लस एन6 या फोनमध्ये 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट आणि 1200 nits पर्यंतची पीक ब्राइटनेस असेल. या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सिस्टीम देखील असेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा असेल (ज्याचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही).

समोरच्या बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन 60 fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम असेल आणि त्यात ड्युअल-व्ह्यू व्हिडिओ मोडदेखील उपलब्ध असणार आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी, यात व्हेपर चेंबर कूलिंग सोल्यूशन देखील असेल.

या फोनमध्ये हा मीडियाटेक प्रोसेसर असेल

कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे की, वनप्लस एन6 (OnePlus N6) भारतात फ्रेश मिंट (Fresh Mint) आणि मिडनाईट ग्रीन (Midnight Green) या दोन रंगांमध्ये लाँच केला जाईल.

हा हँडसेट यापूर्वी गीकबेंच (Geekbench) बेंचमार्किंग प्लॅटफॉर्मवर दिसला होता, ज्यामध्ये ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी6835 (MediaTek MT6835) चिपसेट (जो मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 (MediaTek Dimensity 6300) किंवा मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ एसओसी (MediaTek Dimensity 6100+ SoC) असू शकतो.

6 जीबी रॅम आणि एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू (ARM Mali-G57 MC2 GPU) आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन अँड्रॉइड 16 (Android 16) वर चालेल अशी अपेक्षा आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video : कुत्र्याची चेन कोणी घालतं का? नव्या लुकमुळे मलायका ट्रोल; बॉडी शेपरचीही तुफान चर्चा !
  • दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
  • Monsoon: मान्सूनचे लवकरच टाटा-बाय बाय? यंदा लवकरच निरोप घेणार? सप्टेंबरमध्ये पावसामुळे नवीन टेन्शन
  • Friday Remedies: शुक्रवारी करा ‘हे’ 5 सोपे उपाय; माता लक्ष्मीच्या कृपेने दूर होईल पैशांची चणचण!
  • मोठी बातमी ! आता रूपाली चाकणकरांचं पुण्यात बार-रेस्टॉरंट, उद्घाटनाला बडे नेते, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in