• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताच्या स्टार क्रिकेटपटूच्या घरात मोठा राडा; जेवण बेचव बनवल्याने वडिलांच्या साथीने केली आचाऱ्याला मारहाण, पोलिसांत FIR दाखल

June 30, 2026 by admin Leave a Comment

इंडियन प्रीमियर लीगमधील क्रिकेटपटू शंशाक सिंह वादात सापडला आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील क्रिकेटपटू शंशाक सिंह आणि त्याचे वडील निवृत्त आयपीएस शैलेश सिंह यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर भोपाळमधील घरातील आचाऱ्याला मारहाण, शिवीगाळ करत बेकायदेशीरित्या घरात डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी क्रिकेटपटू शंशाक सिंह आणि शैलेश सिंह यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

दोघांसहित कुटुंबासाठी चालक म्हणून काम करण्याऱ्या वाहन चालकाला देखील सहआरोपी करण्यात आलं आहे. भोपाळच्या रातीबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मूळचा रीवा जिल्ह्यात राहणारा 31 वर्षीय आचारी विपेंद्र सिंह तोमर यांच्या आरोपावरून पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आली आहे.

विपेंद्र यांच्या आरोपानुसार, एका व्यक्तीच्या ओळखीने विप्रेंद्र क्रिकेटपटूच्या घरात आचारी म्हणून कामाला लागला. त्याला महिना 15000 रुपये पगार, राहण्याची सुविधा, भविष्यात सरकारी नोकरीचं आश्वासन देत माजी पोलीस अधिकारी शैलेश सिंह यांनी बंगल्यावर कामावर ठेवण्यात आलं. काम सुरू केल्यानंतर काही तासांतच बनवलेल्या पदार्थाच्या चवीवरून उलटसुलट बोलण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिवीगाळ देखील करण्यात आली.

पीडित विपेंद्र यांच्या माहितीनुसार, घरातील वातावरण बिघडल्याने त्याने नोकरी सोडण्याचा विचार केला. त्यानंतर नोकरी सोडून घरी जात असल्याचे सांगितले. यामुळे दोन्ही आरोप भडकले. त्यांनी बळजबरीने विपेंद्र यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्याला कोणालाही संपर्क न करताना गुपचूप काम करण्यास सांगितले. दोघांना राग पाहून विपेंद्र यांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर दोघांनी दरवाजा उघडून विपेंद्र यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत पीडित व्यक्तीच्या चेहरा आणि शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत, यातून त्यांना मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. तत्पूर्वी, या प्रकरणी रातीबड पोलिसांनी तक्रार आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारावर आरोपी क्रिकेट आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात एफआयआर नोंदवून घेतला. तसेच भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत विविध कलमान्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Murder Case : जे कधीच घडलं नाही, तेच केतन अग्रवाल प्रकरणात घडणार, पोलीस थेट AIच्या मदतीने… कोणता पुरावा येणार हाती?
  • Deool Band 2: अखेर ‘देऊळ बंद 2’ने उमटवली 100 कोटी रुपयांवर मोहोर; प्रवीण तरडेंची मोठी घोषणा
  • Krishi Thapanda : अभिनेत्री कृषी थपंडाच्या घरात बिझनेसमॅनचा मृत्यू, तिने हात जोडले विनंती केली की..
  • Gautam Gambhir : आता गौतम गंभीरचा मित्र परिवार श्रेयस अय्यरला जबाबदार धरेल पण ड्रेसिंग रुममधल्या..हेड कोचना धरलं धारेवर
  • ePik Pahani: बळीराजासाठी आनंदवार्ता! ई-पीक पाहणीत मोठा बदल, शेतकर्‍यांच्या मानगुटीवरील ते ओझे हलके

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in