• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताचं टेन्शन अखेर मिटलं, इराणकडून थेट घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी या दिवशी खुली होणार; इंधनटंचाई संपणार!

May 24, 2026 by admin Leave a Comment


America Israel War : अमेरिका-इराण युद्धामुळे संपूर्ण जगाची घडी विस्कटली आहे. इंधनाची प्रचंड कमतरता भासत असून लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतात तर पेट्रोल आणि डिझेल या प्रमुख इंधनांचा भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी होर्मुझची सामुद्रधुनी जवळजवळ बंद केली होती. ही बंदी अजूनही कामय आहे. या निर्णयामुळे भारत, पाकिस्तान, चीन तसेच युरोपातील इंधन पुरवठा विस्कळीत झालेला आहे. दरम्यान, हे युद्ध थांबवण्यासाठी इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असून लवकरच दोन्ही देशांत युद्ध समाप्तीचा सामंजस्य करार होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन आता इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीमुळे आता जगाला एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे.

इराणने नेमकं काय सांगितलं आहे?

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसमाप्तीसाठी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारत्मक असून लवकरच या चर्चेला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. या चर्चेतून एक सामंजस्य करार केला जाईल. हा करार अस्तित्त्वात आल्यास तसेच आमच्या मागण्या अमेरिकेने मान्य केल्यास करार अमलात आल्यापासून साधारण 30 दिवसात होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक आम्ही पूर्ववत करू, असे इराणने सांगितले आहे. म्हणजेच अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धसमाप्तीचा करार अस्तित्त्वा आल्यानंतर पुढच्या तीस दिवसां होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारत, चीन, पाकिस्तान तसेच इतरही देशांमध्ये नैसर्गिक वायू, कच्चे तेल सुरळीतपणे पोहोचायला लागेल. परिणामी भारतासह इतरही देशांना पोहोचत असलेली महागाईची झळ कमी होईल.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील इराणसोबत लवकरच युद्धसमाप्तीचा करार अस्तित्त्वात येऊ शकतो, असे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आता हे युद्ध संपण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in