• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात; पंढरपूरला दर्शनाला जाताना घडली दुर्घटना

July 20, 2026 by admin Leave a Comment


सोलापूरमधून मोठी बातमी हाती आली आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात ही घटना घडली आहे. या कारमध्ये आमदार नारायण कुचे नव्हते. तर त्यांचे चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी होता. अपघाताच्या या घटनेने महामार्गावर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नारायण कुचे आणि त्यांचे सहकारी छत्रपती संभानीनगरवरून पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त विठुरायांच्या दर्शनाला जात असताना ही घटना घडली. धोकादायक वळणावर कार नियंत्रित न झाल्यामुळे उलटल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेत कारचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

नेमकं काय घडलं?

आषाढी वारी सोहळा सुरू आहे. राज्यभरातील नेते मंडळी पंढरीच्या विठुरायांच्या दर्शनासाठी जात आहेत. आमदार कुचे देखील पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्या ताफ्यात अनेक गाड्या होत्या. ताफ्यात पंढरपूरला जाताना आमदार कुचे त्यांच्या कारमध्ये बसले नव्हते. त्यांच्या कारमध्ये चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी बसला होता. ते कारमध्ये नसल्याने अपघातामधून बचावले. या अपघतात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या घटनेविषयी आमदार नारायण कुचे यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने कारमधील तिघांना सुरक्षित ठिकाणी नेले. तसेच रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी देखील सुरळीत केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune News : त्यांनी मारलं हो पोरीला…पुण्याच्या शिल्पा गवारे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिलांच्या आरोपांनी एकच खळबळ!
  • कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले डोंबिवलीचे सुभेदार नेपाळपुरात बेपत्ता?, संपर्क तुटल्याने पित्याच्या शोधासाठी मुलाची धावाधाव
  • धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की… श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
  • यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
  • मोठी बातमी! पहिल्या अडीच वर्षांनंतर शिंदे गटाला मिळणार मुंबईचे महापौरपद? थेट… नेमकं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in