• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भाजपा नेत्याच्या मुलीनेच उडवला नवीन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा मजाक, थेट म्हटले, हा सर्वात वाईट..

July 31, 2026 by admin Leave a Comment


कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जंतर मंतरवर झाले. हे आंदोलन चिघळताना दिसले. फक्त दिल्लीच नाही तर देशभरात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शेवटी सरकारला माघार घेत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. हा सरकारला मोठा दणका नक्कीच म्हणावा लागेल. हेच नाही तर भारतीय जनता पार्टीतील नेत्यांच्या कुटुंबियांनीही या आंदोलनाला समर्थन दिले. या आंदोलनादरम्यान एक नाव तूफान चर्चेत राहिले ते म्हणजे यशस्विनी राजे सिंह. कंटेंट क्रिएटर यशस्विनी राजे सिंह हिने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीरपणे समर्थन दिले. फक्त हेच नाही तर जाहीरपणे ती अनेकदा सरकावर टीका करतानाही दिसली. आता तिने नवीन शिक्षणमंत्र्यांवर थेट टीका केली. ज्यामुळे खळबळ उडाली.

नवीन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांबद्दल बोलताना तिने थेट वाईट मजाक म्हटले. यशस्विनी उत्तर प्रदेशचे भाजपाचे नेते आणि माजी भाजपा आमदार विक्रम सिंह यांची मुलगी आहे. ती जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी झाली होती. अल जजीराला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना तिने नवीन केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले.

यावर बोलताना तिने म्हटले की, हा सर्वात वाईट मजाक आहे. जंतर मंतरवर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात 20 जूनपासून आंदोलनाला सुरूवात झाली होती. तब्बल 36 दिवस हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर विद्यार्थी अधिक आक्रमक होताना दिसले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हे आंदोलन संपले. विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यात सरकार आणि कॉकरोच जनता पार्टी पुन्हा आमने सामने आली.

अभिजीत दिपके भाजपावर गंभीर आरोप करतानाही दिसले. त्यांनी म्हटले की, माझ्या आई वडिलांना धमक्या दिल्या जात आहेत. मला भाजपामध्ये दाखल होण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी तूफान चर्चेत आले. काही दिवसांपूर्वीच स्थापन झालेल्या पार्टीने आंदोलन केले आणि थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनामा घेतला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर हे खाते प्रल्हाद जोशींकडे देण्यात आले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in