• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भाजपात प्रवेश केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्याने 24 तासांत ठोकला राम राम…; म्हणाले, ‘अडचणीत सापडल्यानंतर पक्ष…’

June 23, 2026 by admin Leave a Comment


सिनेविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी झगमगत्या विश्वाला राम राम ठोकला आणि राजकारणात प्रवेश केला. तर काही सेलिब्रिटी असे देखील आहेत, ज्यांनी बॉलिवूडचा प्रवास न थांबवता राजकारणात प्रवेश केला आणि आता ते राजकारणात सक्रिय आहे… पण एक अभिनेता असा आहे ज्याने, भाजप पक्षातून राजकारणात प्रवेश केला, पण अभिनेत्याचा प्रवास फक्त 24 तासांचा होता. सध्या ज्या अभिनेत्याच्या राजकीय प्रवासाची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेते शेखर सुमन आहेत. शेखर सुमन यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्याचं मनोरंजन केलं. पण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 24 तासांत त्यांनी स्वतःचा राजकीय प्रवास संपवलेला. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, त्यांनी पक्ष सोडण्यामागचं मोठं कारण देखील सांगितलं आहे.

‘शेखर टुनाईट’च्या लाँचवेळी, शेखर सुमन यांनी आनंदात स्वतःच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगितलं. अभिनेते म्हणाले, ‘मी फक्त 24 तासांसाठी राजकारणी बनलेलो आणि मला माझी चूक कळताच मी माघार घेतली…’. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शेखर सुमन म्हणाले, आयुष्यात काही घडामोडी घडतात, ज्यामुळे आपण एका वेगळ्या वळणावर येतो… शेखर सुमन यांना वाटायचं की, त्यांना कायम कोपऱ्यात ढकललं जात आहे… तेव्हाच त्यांनी फार कोणत्या गोष्टीचा विचार न करता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला… पण चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पक्षातून माघार देखील घेतली.

भाजपच्या प्रवेशाबद्दल शेखर सुमन म्हणाले, ‘कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यावेळी तुम्ही अडचणीत सापडता आणि काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात नसतात… असं माझ्यासोबत दोन वेळा घडलं आहे. मला जे करायचं नव्हतं ते मी केलं आहे.. ‘, एवढंच नाही तर, शेखर सुमन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती, यावर देखील त्यांनी मोठा खुलासा केलाय.

शेखर सुमन म्हणाले, ‘तेव्हा देखील कोणता पर्याय नसल्याने मला असं करावं लागलं… निवडणुक लढवण्याची माझी जगाही इच्छा नव्हती… आजही मला कळत नाही, मी तेव्हा असं का केलं… पण तो फक्त एक पक्षप्रवेश होता, पूर्णवेळ राजकीय प्रवास नव्हता…’, असं देखील संजय राऊत म्हणाले…



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा जीआर आला, 3000 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर!
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
  • काय सांगता? 50 किलो कांदा खरेदी केल्यास पोलीस उचलून नेणार? नियमाने कुणाला फुटला घाम
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
  • कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in