• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भाजपला जबर झटका, धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, कशामुळे नाराज, कारण तरी काय?

July 31, 2026 by admin Leave a Comment


भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी तडकाफडकी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याची दिल्लीत मोठी चर्चा सुरू आहे. माध्यमातील वृ्त्तानुसार, त्यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे त्यांचा राजीनामा सोपावला आहे. त्यांनी समाज माध्यमावरील त्यांच्या एक्स खात्यातही महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यांनी भाजपचा उल्लेख हटवला आहे. त्यांच्या पदाविषयीची माहिती दुरूस्त केली आहे. दिल्ली सध्या अनेक घटनांचे केंद्रबिंदु ठरले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून CJP आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, पावसाळी अधिवेशनातील घाडमोडी सुरू असतानाच त्यांनी राजीनामा दिल्याने चर्चा होत आहे.

का दिला राजीनामा?

सीएनएन न्यूज 18 ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावाला यांनी पक्षाकडे राजीनामा पाठवला आहे. वृत्तानुसार, शहजाद पुनावाला यांनी राजीनामा हा वैयक्तिक कारणांनी दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याविषयी अद्याप पक्षाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. पक्षाने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण एक्सवर पुनावाला यांनी त्यांचा बायो शेअर केला आहे. बायोमध्ये त्यांनी भाजपचा उल्लेख हटवला आहे. त्यांच्या पदाचाही उल्लेख दूर केला आहे.

एक्स बायोमध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख

शहजाद पुनावाला यांनी एक्सवर त्यांच्या बायोमध्ये पीएम मोदी यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला आहे. पीएम मोदी यांचे आपण आजीवन फॉलोअर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुनावाला यांच्या बायोनुसार, ” धर्म इस्लाम आहे. संस्कृती – हिंदू, विचारधारा-भारतीय , लेखक: जीएसटी प्रवास, पीएम मोदी यांचा आजीवन अनुयायी.”

काँग्रेस सोडून भाजपमध्ये सहभागी

यापूर्वी शहजाद पुनावाला 2017 मध्ये काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते. काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची निवड प्रक्रियेवर तोंडसुख घेत त्यांनी पक्ष सोडला होता. भाजपमध्ये दाखल होताच त्यांना मोठी जबाबदारी मिळाली. त्यांना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली. अनेक मंचावर ते भाजपची मुलूख मैदान तोफ म्हणून काम करत होते. एका पॉडकॉस्टमध्येच त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. 2024 मधील लोकसभा निवडणुकीनंतर आपण राजकीय संन्यास घेऊ असे त्यांनी संकेत दिले होते. तरीही त्यांनी काही दिवस पक्षाची बाजू हिरारीने मांडली. त्यांच्या राजीनाम्यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in