• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भरत जाधव यांनी केलं ‘कारभारी लयभारी’ फेम अनुष्का-निखिलचं केळवण; उखाण्याची चर्चा

June 11, 2026 by admin Leave a Comment


'कारभारी लयभारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची जोडी आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. या दोघांसाठी अभिनेते भरत जाधव आणि सुधीर निंबाळकर यांच्या कुटुंबीयांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं.

'कारभारी लयभारी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाणची जोडी आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. या दोघांसाठी अभिनेते भरत जाधव आणि सुधीर निंबाळकर यांच्या कुटुंबीयांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं.

यावेळी कमलाकर सातपुते शर्मिला शिंदेही उपस्थित होते. आगामी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत पार पडलेल्या या खास भेटीत आनंद आपुलकी आणि कौटुंबिक स्नेहाची सुंदर झलक पाहायला मिळाली. अनुष्का आणि निखिल हे मालिकेत एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले.

यावेळी कमलाकर सातपुते, शर्मिला शिंदेही उपस्थित होते. आगामी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत पार पडलेल्या या खास भेटीत आनंद, आपुलकी आणि कौटुंबिक स्नेहाची सुंदर झलक पाहायला मिळाली. अनुष्का आणि निखिल हे मालिकेत एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले.

केळवणाच्या कार्यक्रमात निखिल आणि अनुष्का यांनी एकमेकांसाठी उखाणे घेतले. 'लग्नसराई सुरू झाली लवकरच दारी येणार निखिलची वरात.. तू तू मी मी चे पुढील प्रयोग आता होणार आमच्याच घरात' असा भन्नाट उखाणा अनुष्काने निखिलसाठी घेतला.

केळवणाच्या कार्यक्रमात निखिल आणि अनुष्का यांनी एकमेकांसाठी उखाणे घेतले. 'लग्नसराई सुरू झाली लवकरच दारी येणार निखिलची वरात.. तू तू मी मी चे पुढील प्रयोग आता होणार आमच्याच घरात', असा भन्नाट उखाणा अनुष्काने निखिलसाठी घेतला.

त्यानंतर निखिलनेही अनुष्कासाठी खास उखाणा घेतला. 'भरत सरांना सांगितलं मी लग्न करतोय तर सर म्हणाले सही रे सही.. अनुष्का वचन दिले मी तुला कधी होणार नाही तू तू मी मी' असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

त्यानंतर निखिलनेही अनुष्कासाठी खास उखाणा घेतला. 'भरत सरांना सांगितलं, मी लग्न करतोय तर सर म्हणाले सही रे सही.. अनुष्का वचन दिले मी तुला कधी होणार नाही तू तू मी मी', असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण येत्या 24 जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील माजघर या प्रसिद्ध हॉटेलमध्ये या दोघांचं केळवण पार पडलं. सध्या अनुष्का 'वचन दिले तू मला' या मालिकेत भूमिका साकारत आहे. तर निखिल 'ऑल द बेस्ट' या नाटकामुळे चर्चेत आहे.

अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण येत्या 24 जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील माजघर या प्रसिद्ध हॉटेलमध्ये या दोघांचं केळवण पार पडलं. सध्या अनुष्का 'वचन दिले तू मला' या मालिकेत भूमिका साकारत आहे. तर निखिल 'ऑल द बेस्ट' या नाटकामुळे चर्चेत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in