• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भयंकर! बॉयफ्रेंडने रागाच्या भरात रॉकेल ओतून गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं, टॉप सिक्रेट ठरलं हत्येचं कारण

July 4, 2026 by admin Leave a Comment


हरियाणाच्या गुरुग्राममधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने रागाच्या भरात गर्लफ्रेंडवर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. आगीत होरपळलेल्या तरुणीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी सुनीलला अटक केली आहे. त्याच्याजवळील रॉकेलची बॉटल देखील जप्त केली आहे. या प्रकरणी आरोपीला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास जलद वेगाने सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील हा मागील दीड वर्षांपासून पीडित तरुणीसोबत रिलेशनमध्ये होता. याचदरम्यान पीडित तरुणीला सुनील हा विवाहित असल्याचे समजले. त्यानंतर पीडित तरुणी रागाच्या भरात बॉयफ्रेंडच्या दुकानावर पोहोचली. तिने रागाच्या भरात बॉयफ्रेंडशी भांडू लागली. बॉयफ्रेंडने वादादरम्यान गर्लफ्रेंडच्या अंगावर रॉकेल ओतलं.

दोघांमधील वाद मिटल्याने दोघे गुरुग्रामच्या सोहना रोडवर एका रुमवर गेले. दोघे रात्री रुमवरच झोपी गेले. तरुणीने सकाळी कालचा ड्रेस घातला. तिच्या ड्रेसवरील रॉकेलचा वास गेला नव्हता. त्यानंतरही तिने तोच ड्रेस घातला. काही वेळाने दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला पेटवून दिलं. त्यानंतर आरोपीनेच गर्लफ्रेंडला आर्टेमिस रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर झाल्याने सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आलं. परंतु तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

…अन् आरोपी अडकला पोलिसांच्या जाळ्यात 

पीडित तरुणीचा 27 जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी 30 जुलै रोजी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारकर्त्या नातेवाईकांनी सांगितलं की, पीडित तरुणी आणि माझी 22 जुलै रोजी भेट झाली. तिला सुनील उर्फ नोनी नावाच्या व्यक्तीने जिवंत जाळलं. पोलिसांत (Police) तक्रार दिल्यास आईलाही जिवे मारण्याची धमकी त्याने दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनीलला अटक केली. तत्पूर्वी, सुनीलने गर्लफ्रेंडला जिवंत जाळल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी आरोपी सुनीलवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कमी खाल्ल्यानंतरही वजन कमी होत नाही? ‘सर्व्हायव्हल मोड’ म्हणजे काय आणि त्यामागील सत्य
  • हे झाड म्हणजे सापांचं अंडे देण्याचं सर्वात आवडतं ठिकाण; चुकूनही घराच्या आसपास लावू नका, साप घरात घुसतील
  • पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय हवा? तूप आणि मनुका ठरेल फायदेशीर
  • पावसाचा फटका बॉलिवूडच्या बिग बींना, 50 कोटींच्या बंगल्यात शिरलं पाणी, घराबाहेर पडणं देखील झालं कठीण
  • भयंकर! बॉयफ्रेंडने रागाच्या भरात रॉकेल ओतून गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं, टॉप सिक्रेट ठरलं हत्येचं कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in