• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ब्रोकोली फक्त सॅलडसाठीच नाही, तर त्यापासून हे 5 चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ ‍नक्की करा ट्राय

July 30, 2026 by admin Leave a Comment


बदलत्या जीवनशैलीत आपल्यापैकी अनेकजण तंदुरस्त राहण्यासाठी आपल्या आहारात चविष्ट आणि पौष्टिक अशा दोन्ही प्रकारच्या भाज्यांचा समावेश करत आहेत. त्यात अनेकजण त्यांच्या डाएटमध्ये ब्रोकोलीचे सेवन रोज करत असतात. कारण ही अशीच एक हिरवी भाजी आहे, जी निरोगी जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग मानली जाते. तिचा वापर अनेकदा सॅलडमध्ये केला जातो. तिच्या सौम्य चवीमुळे आणि कुरकुरीत टेक्स्चरमुळे लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण आहारात ब्रोकोलीचा समावेश करतात.

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, फायबर , पोटॅशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास, पचनक्रिया सुधारण्यास, हाडांच्या आरोग्यास मदत होते आणि फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमच्या शरीराचे संरक्षण होते. शिवाय त्यात कॅलरीज कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ब्रोकोली संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग बनते. चला ब्रोकोलीपासून बनवता येणारे काही चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ तसेच ते खरेदी करताना आणि शिजवताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात हे जाणून घेऊयात.

ब्रोकोली पासून हे 5 चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ बनवा

ब्रोकोली सूप

ब्रोकोली, कांदा आणि लसूण हलके उकडवून घ्या. त्यानंतर यासर्व गोष्टी वाटून घ्या. त्यानंतर एका कढईत ही पेस्ट पुन्हा काही मिनिटे शिजवा आणि अगदी थोड्या प्रमाणात त्या पाणी टाकून त्यात चवीनुसार मीठ टाका. इच्छित असल्यास तुम्ही थोडे दूध किंवा काळी मिरी देखील यात ‍मिक्स करू शकता. थोडावेळ छान उकळवून घ्या आणि अशाप्रकारे टेस्टी ब्रोकोली सुप पिण्यास तयार आहे. हे हलके आणि पौष्टिक सूप व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकतात.

ब्रोकोली कटलेट्स

वाफवलेली ब्रोकोली, उकडलेले बटाटे, गाजर, ओट्स किंवा ब्रेडक्रंब्स आणि सौम्य मसाले एकत्र करून कटलेट्स तयार करा. त्यांना अगदी कमी तेलात तव्यावर तळा किंवा एअर फ्रायरमध्ये देखील तळू शकता. हा चविष्ट नाश्ता फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असून मुलांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

ब्रोकोली पनीर

ब्रोकोली आणि पनीरचे तुकडे कांदे, टोमॅटो, आले-लसूण आणि रोजच्या जेवणात वापरले जाणाऱ्या मसाल्यांसोबत शिजवा. गव्हाच्या किंवा मल्टीग्रेन रोटीसोबत सर्व्ह करा. या पदार्थातून पनीरमधील प्रथिने आणि कॅल्शियम, तसेच ब्रोकोलीमधील व्हिटॅमिन सी आणि फायबर यांचा फायदा होऊ शकतो.

ब्रोकोली पराठा

ब्रोकोली किसून घ्या आणि त्यात कोथिंबीर, आले, हिरव्या मिरच्या व इतर काही मसाले मिक्स करा. गव्हाच्या पिठाच्या गोळ्यात हे मिश्रण भरा, त्याचा पराठा लाटा आणि तव्याला हलके तूप लावून त्यावर भाजा. हा चविष्ट पदार्थ फायबर, जीवनसत्त्वे आणि ऊर्जेचा चांगला स्रोत ठरू शकतो.

ब्रोकोली पास्ता

पास्ता पाण्यात टाकून शिजवून घ्या. एका पॅनमध्ये ब्रोकोली, शिमला मिरची, कांदे आणि लसूण हलके परतून घ्या, नंतर त्यात पास्ता आणि तुमचा आवडता सॉस टाकून सर्व ‍मिश्रण काही मिनिटे शिजवा. हा पदार्थ कर्बोदके, फायबर आणि जीवनसत्त्वे यांचे उत्तम मिश्रण आहे.

ब्रोकोली खरेदी करताना आणि शिजवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

ब्रोकोली खरेदी करताना गडद हिरव्या, टणक आणि ताजी असलेली ब्रोकोली निवडा. पिवळ्या किंवा कोमेजलेली ब्रोकोली घेणे टाळा. वापरण्यापूर्वी ब्रोकोली पूर्णपणे धुवा आणि गरजेनुसार कापून घ्या. ब्रोकोली जास्त वेळ उकळल्याने किंवा जास्त आचेवर जास्त वेळ शिजवल्याने त्यातील काही पोषक तत्वे, विशेषतः व्हिटॅमिन सी, कमी होऊ शकते.

म्हणून, त्याला हलके वाफवणे किंवा थोड्या वेळेसाठी शिजवणे चांगले. ताजी ब्रोकोली फ्रिजमध्ये हवाबंद किंवा छिद्र असलेल्या पिशवीत ठेवा आणि तिची चव व पोषणमूल्ये टिकवून ठेवण्यासाठी काही दिवसांतच वापरा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in