• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बॉलिवूडच्या ‘या’ गाण्याने उडलेली जगभरात खळबळ, बप्पी लहरींनी उचलेलं मोठं पाऊल आणि मिळाले 4744 कोटी रुपये

June 7, 2026 by admin Leave a Comment


1981 सालची घटना आहे. बॉलिवूडचे डिस्को किंग बप्पी लहरी यांनी ‘ज्योती’ सिनेमासाठी एक आयकॉनिक गाणं तयार केलं होतं. गाण्यासा संगीत दिवंगत गायक बप्पी लहरी यांनी दिलेलं, तर आवाज दिवंगत गायिका लका मंगेशकर यांनी दिलेलं. जेव्हा गाणं प्रदर्शित झालं, तेव्हा प्रत्येकाच्या ओठांवर याच गाण्याच्या ओळी असायच्या. सर्वकाही सुरळीत सुरु होतं. पण हे गाणं प्रदर्शित झाल्याच्या 21 वर्षांनंतर हॉलिवूडने या गाण्याचे ताल चोरी केले. तुम्हाला आठवत असेल, 2002 मध्ये अमेरिकी हिप – हॉप आर्टिस्ट ट्रुथ हार्ट्स (Truth Hurts) चं एक गाणं प्रदर्शित झालं होतं आणि गाण्याचं नाव होतं, ‘एडिक्टि्व्ह’, जेव्हा भारतीयांनी हे गाणं ऐकलं, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कारण ‘एडिक्टि्व्ह’ गाण्याचं बॅकग्राउंड संगीत पूर्णपणं लता मंगेशकर यांच्या ‘थोडा रेशम लगता है’ गाण्यातून घेतलं होतं.

बप्पी लहरी यांनी उचललं मोठं पाऊल…

जेव्हा ही गोष्ट बप्पी लहरी यांनी कळली, तेव्हा त्यांनी ‘एडिक्टि्व्ह’ हे संपूर्ण गाणं ऐकलं आणि तात्काळ म्यूजिक लेबल ‘सारेगामा’ सोबत अमेरिकेतील कोर्टाचा दरवाजा ठोठावला. बप्पी लहरी यांनी ‘एडिक्टि्व्ह’ गाण्याचे निर्माते डॉ. ड्रे यांच्यावर खटला दाखल केला. कोर्टात निर्माते ड्रे यांनी सांगितलं की, गाण्याचे ताल एका विदेशी रेडियो स्टेशनवर ऐकली आणि त्यांनी कल्पना नव्हती की, याचे कॉपीराइट्स कोणाकडे आहेत.

कोर्टाने सुनावलेला मोठा निर्णय

गाण्याबद्दल बप्पी लहरी आणि डॉ. ड्रे यांच्यातील कायदेशीर लढाई फार काळ चालली. अखेर या लढाईमध्ये विजय बप्पी दा यांचा झाला. कोर्टाने आदेश दिले की, गाण्यामध्ये बप्पी लहरी आणि ‘सारेगामा’ला क्रेडिट जोपर्यंत दिलं जात नाही, तोपर्यंत ‘एडिक्टि्व्ह’ गाण्याच्या सीडी आणि एल्बम विक्रीवर कोर्टाने बंदी आणली होती.

4 हजार 744 कोटी रुपये

कोर्टाने हॉलिवूड कंपनीवर मोठा दंड देखील ठोठावला. भरपाई आणि रॉयल्टी मिळवून कोर्टाने हॉलिवूड कंपनीवर 500 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार, 4 हजार 744 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.

‘ज्योती’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा त्याची कथा आणि गाण्यांमुळे दमदार हीट झाला. सिनेमात अभिनेते जितेंद्र यांनी डबल रोल साकारलेला. सिनेमात जितेंद्र यांच्यासोबत अभिनेत्री हेमा मालिनी, अशोक कुमार, शशिकला आणि अजीत यांनी मुख्य भूमिका साकारली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
  • खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in