
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री नेहल वडोलिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या बोल्ड व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या नेहलने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये कामाच्या अनुभवांबाबत अनेक खुलासे केले.
नेहल सध्या केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर इंटिमसी कोऑर्डिनेटर म्हणूनही काम करत आहे. चित्रपट आणि वेब सिरीजमधील जवळीक दाखवणारे प्रसंग सुरक्षित आणि कलाकारांना सोयीस्कर वातावरणात चित्रित व्हावेत यासाठी ती कलाकार, दिग्दर्शक आणि तांत्रिक टीमला मार्गदर्शन करते.
एका मुलाखतीदरम्यान नेहलने सांगितले की, वेब सिरीज किंवा चित्रपटांमधील इंटिमेट सीन हे कलाकारांच्या इच्छेनुसार नाही तर कथानकाच्या गरजेनुसार आणि स्क्रिप्टनुसार लिहिले जातात. अशा सीनचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक केले जाते.
किसिंग सीन खरे असतात की कॅमेऱ्याच्या तंत्रज्ञानामुळे तसे दिसतात असा प्रश्न विचारला असता नेहलने सांगितले की अनेकदा कॅमेरा अँगल्स आणि तांत्रिक पद्धतींचा वापर केला जातो. मात्र काही कलाकार स्वतःच्या संमतीने असे सीन प्रत्यक्षातही साकारतात.
यावेळी तिने एका वेब सिरीजच्या शूटिंगदरम्यान घडलेला मजेशीर प्रसंगही सांगितला. एका खोलीत ती सहकलाकारासोबत किसिंग सीनचे शूटिंग करत होती. दिग्दर्शकाने मॉनिटर रूममधून कट म्हटले होते, पण आवाज स्पष्टपणे ऐकू न आल्यामुळे तिला शूट संपल्याचे समजले नाही. त्यामुळे सीन काही क्षण सुरूच राहिला.
नंतर सहकलाकाराने शूट संपल्याचे सांगितल्यावर नेहलला आपली चूक लक्षात आली आणि ती थोडीशी लाजली. हा अनुभव सांगताना तिने सेटवरील वातावरण आणि अशा दृश्यांच्या शूटिंगमागील व्यावसायिकता यावरही प्रकाश टाकला.





Leave a Reply