• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘बॅस्टियन’मधून शिल्पा शेट्टीची कोट्यवधींची कमाई, पण एकही रुपया नेत नाही घरी; पतीने सांगितलं सिक्रेट

July 23, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आजवर विविध चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त ती इतर व्यवसायातूनही कोट्यवधींची कमाई करत आहे. शिल्पाचा 'बॅस्टियन' नावाचा रेस्टॉरंट अनेकांच्या परिचयाचा आहे. तिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राने व्यवसायाबद्दल खुलासा केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आजवर विविध चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त ती इतर व्यवसायातूनही कोट्यवधींची कमाई करत आहे. शिल्पाचा 'बॅस्टियन' नावाचा रेस्टॉरंट अनेकांच्या परिचयाचा आहे. तिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राने व्यवसायाबद्दल खुलासा केला आहे.

राज कुंद्राने खुलासा केला की शिल्पा आणि तो 'बॅस्टियन'च्या कमाईचा एकही पैसा घरी नेत नाहीत. ते पगार किंवा कमावलेला नफासुद्धा घेत नाहीत. रेस्टॉरंटमधून मिळणारा सर्व नफा बिझनेसच्या विस्तारासाठी पुन्हा गुंतवला जातो. यामुळेच एका आऊटलेटने सुरू झालेला हा ब्रँड आता देशभरात जवळपास नऊ रेस्टॉरंटपर्यंत वाढला आहे.

राज कुंद्राने खुलासा केला की, शिल्पा आणि तो 'बॅस्टियन'च्या कमाईचा एकही पैसा घरी नेत नाहीत. ते पगार किंवा कमावलेला नफासुद्धा घेत नाहीत. रेस्टॉरंटमधून मिळणारा सर्व नफा बिझनेसच्या विस्तारासाठी पुन्हा गुंतवला जातो. यामुळेच एका आऊटलेटने सुरू झालेला हा ब्रँड आता देशभरात जवळपास नऊ रेस्टॉरंटपर्यंत वाढला आहे.

राज कुंद्राने यावेळी असाही खुलासा केला की बिझनेसमध्ये त्यांच्यासाठी वास्तूला विशेष महत्त्व आहे. बॅस्टियनचं कोणतंही नवीन आऊटलेट सुरू करण्यापूर्वी वास्तू तज्ज्ञ आणि पंडित संपूर्ण जागेची सखोल पाहणी करतात. सर्वकाही अनुकूल आढळल्यानंतरच नवीन रेस्टॉरंट सुरू केलं जातं असं त्याने सांगितलं.

राज कुंद्राने यावेळी असाही खुलासा केला की, बिझनेसमध्ये त्यांच्यासाठी वास्तूला विशेष महत्त्व आहे. बॅस्टियनचं कोणतंही नवीन आऊटलेट सुरू करण्यापूर्वी वास्तू तज्ज्ञ आणि पंडित संपूर्ण जागेची सखोल पाहणी करतात. सर्वकाही अनुकूल आढळल्यानंतरच नवीन रेस्टॉरंट सुरू केलं जातं, असं त्याने सांगितलं.

ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ जया मदन यांनी दावा केला की बॅस्टियनचं पहिलं आऊटलेट सुरू झाल्यानंतर त्यांनी भविष्यवाणी केली होती की बॅस्टियन एकेदिवशी मोठा ब्रँड बनेल. त्यांनी अशीही भविष्यवाणी केली होती की शिल्पा आणि राज यातून खूप पैसे कमावतील पण तो पैसा ते नवीन आऊटलेट्समध्ये गुंतवतील. ही भविष्यवाणी बऱ्याच अंशी खरी ठरल्याची कबुली राजने दिली.

ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ जया मदन यांनी दावा केला की, बॅस्टियनचं पहिलं आऊटलेट सुरू झाल्यानंतर त्यांनी भविष्यवाणी केली होती की, बॅस्टियन एकेदिवशी मोठा ब्रँड बनेल. त्यांनी अशीही भविष्यवाणी केली होती की, शिल्पा आणि राज यातून खूप पैसे कमावतील, पण तो पैसा ते नवीन आऊटलेट्समध्ये गुंतवतील. ही भविष्यवाणी बऱ्याच अंशी खरी ठरल्याची कबुली राजने दिली.

गेल्या वर्षी लेखिका शोभा डे यांनी असा दावा केला होता की मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटची एका रात्रीत दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र शिल्पा शेट्टीने नंतर हे दावे फेटाळून लावले होते. तसं असतं तर किती बरं झालं असतं. मला आशा आहे की एकेदिवशी असं घडेल. पण सध्या तरी हे आकडे अचूक नाहीत अशी प्रतिक्रिया शिल्पाने दिली होती.

गेल्या वर्षी लेखिका शोभा डे यांनी असा दावा केला होता की, मुंबईतील बॅस्टियन रेस्टॉरंटची एका रात्रीत दोन ते तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र शिल्पा शेट्टीने नंतर हे दावे फेटाळून लावले होते. “तसं असतं तर किती बरं झालं असतं. मला आशा आहे की एकेदिवशी असं घडेल. पण सध्या तरी हे आकडे अचूक नाहीत”, अशी प्रतिक्रिया शिल्पाने दिली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील कोस्टल रोड आणि वरळी-सी लिंकवर या वाहनांना कायमची बंदी? वाचा नवे निर्बंध
  • भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..
  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार
  • Sugar Rate : आता नो टेन्शन! सरकारच्या त्या निर्णयाने साखरचे दर धडाम, खरेदीदारांना मोठा दिलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in