• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बिबट्याला मारहाण केल्याचा आरोप; शिवसेना नेत्याच्या अडचणी वाढल्या, खडसेंची न्यायालयात धाव

July 21, 2026 by admin Leave a Comment


राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आता एकनाथ खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान या संबंधित एकनाथ खडसेंनी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला होता. आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला मारहाण करून जखमी केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या आरोपांना उत्तर देताना बिबट्या गाव वस्तीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता, तो गाव वस्तीमध्ये शिरू नये, यासाठी आपण त्यावर काठी उगारल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी न्यायालयात धाव घेत, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

मुक्ताईनगर येथील विश्रामगृहात 12 एप्रिल 2026 रोजी बिबट्या शिरला होता. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. बिबट्याला इंजेक्शन मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला. मात्र बिबट्या बेशुद्ध न होता तो गावात शिरण्याच्या तयारीत होता.  यावेळी मुक्ताईनगरचे आमदर चंद्रकांत पाटील यांनी रिस्क्यू
करतेवेळी बिबट्याला मारहाण केली असा खडसेंचा आरोप आहे. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला रेस्क्यू केलं. या संबंधित एकनाथ खडसेंनी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आता खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पुढील सुनावणी  21 ऑगस्ट 2026 रोजी होणार असून,  यावेळी फॉरेस्ट ऑफिसर आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना हजर राहण्यास न्यायालयाने सांगितल्याची माहिती वकिलाने दिली आहे.  त्यामुळे आता या प्रकरणात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पहिला नंबर माझा… ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
  • माजी महिला खासदाराची का झालीये अशी अवस्था! विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम… Photo पाहून व्हाल हैराण
  • नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच, अद्याप 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकाकडून शोधाशोध
  • Laxman Hake: मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी… लक्ष्मण हाके यांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले अफाट ओबीसी…
  • Arshad Warsi: या सगळ्याची सुरुवात कंगनाने केली..; अर्शद वारसी स्पष्टच बोलला, नेमका वाद काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in