• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बायको अन् सासरच्या मंडळीचा त्रास असह्य झाला; लव्ह मॅरेज केलेल्या व्यावसायिकाने आयुष्य संपवलं

June 29, 2026 by admin Leave a Comment


हरियाणाच्या फरीदाबादमध्ये 28 वर्षीय व्यावसायिक राहुलने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येआधी राहुलने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये बायको, सासरच्या मंडळीवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. राहुलचा सोशल मीडियावरील व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राहुलने व्हिडिओतून सासरच्या मंडळीवर केलेल्या आरोपाच्या अंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलने रविवारी घरी आईची भेट घेतली. त्यानंतर त्याच्या दुकानाकडे निघाला. परंतु काही वेळानंतर राहुलने दुकानात आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबाला समजली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी राहुलचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला.

आत्महत्या करण्याआधी काढलेल्या व्हिडिओमध्ये राहुलने सासरच्या मंडळीवर आरोप केले. त्याने पत्नी ज्योती, सासू वीना, सासरा बिट्टू, मेव्हणी नीतू यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला. त्याने म्हटलं की, घरात झाडू मारणे, भांडे घासणे करायचो. त्यानंतरही मारहाण केली जायची. त्याच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केल्याचाही आरोप त्याने केला. यामुळे राहुल मानसिक तणावात होता.

व्हिडिओमध्ये राहुलने म्हटलं की, त्याच्या आत्महत्येसाठी बायको आणि सासरची मंडळी जबाबदार आहे. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. माझ्या मृत्यूनंतर माझी संपत्ती आई, बहीण आणि भावांना देण्यात यावी, अशी अंतिम इच्छा देखील राहुलने बोलून दाखवली. राहुलच्या नातेवाईकांच्या आरोपानुसार, राहुलचा 2 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. लग्नानंतर आई-वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी बायकोने हट्ट केला. त्यामुळे राहुल वेगळा राहू लागला. त्याने 4 महिन्याआधी कपड्याचं नवीन दुकान सुरू केलं होतं.

अनेक दिवसांपासून राहुल मानसिक तणावात

राहुलचा नातेवाईक अमित यांनी आरोप करताना म्हटलं की, बायको आणि सासरच्या मंडळीच्या त्रासामुळे राहुल गेल्या अनेक महिन्यांपासून मानिसक तणावात होता. त्याच्या पत्नीने त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा देखील दाखल केला होता. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने राहुल अधिकच मानसिक तणावात गेला होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in