• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बायकोने गिफ्ट केली आलिशान थार, त्यातच नवऱ्याने संपवून टाकलं, मृतदेहासोबत जे केलं त्याने प्रचंड संताप!

July 26, 2026 by admin Leave a Comment


नवरा बायकोचे नाते हे अतिशय पवित्र नाते असल्याचे मानले जाते. कधी या नात्यात भांडणे होतात तर कधी खूप प्रेमाने सर्व काही सुरळीत सुरु असते. एक असेच प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात बायकोने नवऱ्याला त्याची आवडती गाडी गिफ्ट म्हणून दिली होती. मात्र, नवऱ्याने त्याच गाडीने बायकोचा जीव घेतला. आता नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या सविस्तर…

ही घटना मुरादाबादच्या कटघर पोलीस ठाणे क्षेत्रात घडली. सुरुवातीला गायब झालेल्या तरुणीला शोधण्याचा प्रयत्न सुरु होते. हैदराबादमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय अदीला रहमानची तिच्याच नवऱ्याने गुलफाम अलीने गोळ्या झाडून हत्या केली. आरोपीने हे सर्व आपल्या थार कारमध्येच केले आणि ओळख लपवण्यासाठी मृतदेह उत्तराखंडमधील रुडकी येथील कालव्यात फेकून दिला.

पोलिसांच्या चौकशीत समोर आले की अदीला आणि गुलफाम यांनी याच वर्षी एप्रिल महिन्यात अजमेर शरीफ येथे प्रेमविवाह केला होता आणि दोघेही नोएडामध्ये राहत होते. अदीला आपल्या नवऱ्या गुलफामचे सर्व खर्च स्वतः उचलत असे आणि तिने नवऱ्याला एक महिंद्रा थार कारही भेट दिली होती. अदीलाला सारखे वाटत होते की गुलफामने आपल्या नातेवाईकांशी सर्व संबंध तोडावेत, याबाबत दोघांमध्ये वारंवार भांडणे आणि वाद होत असे.

दिल्लीहून मुरादाबादला येताना वाटेत गोळी झाडली

२५ जूनला अदीला परीक्षा देण्याची सबब सांगून घरातून निघाली होती. पण दिल्लीला पोहोचल्यानंतर तिचा नातेवाईकांशी संपर्क तुटला. २९ जूनला दिल्लीहून मुरादाबादला येताना जोयाजवळ हायवेवर दोघांमध्ये तीव्र वाद झाला. रागात येऊन गुलफामने गाडी थांबवून थारच्या आतच पिस्तुलाने अदीलाला गोळी झाडली. हत्येनंतर आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवून रुडकीला नेला आणि मंगलौर परिसरातील कालव्यात फेकून दिला.

पोलिसांना फसवण्यासाठी सरेंडर करून तुरुंगात गेला

घटना घडवल्यानंतर आरोपीने चतुर चाल चालली. पोलिसांच्या नजरेतून वाचाण्यासाठी गुलफाम रामपूरमधील एका जुन्या गुन्ह्यात न्यायालयासमोर सरेंडर करून तुरुंगात गेला. ४ जुलैला रुडकीच्या मंगलौर येथील कालव्यातून अदीलाचा मृतदेह सापडला होता. ७२ तास ओळख पटली नसल्याने उत्तराखंड पोलिसांनी नियमानुसार मृतदेह बेवारस समजून अंत्यसंस्कार केले होते.

एसपी सिटीचे विधान आणि पोलीस रिमांड

मुरादाबादचे एसपी सिटी कुमार रणविजय सिंह यांनी सांगितले की आधी बेपत्ता झाल्याची आणि नंतर नातेवाईकांच्या तक्रारीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामपूर तुरुंगात बंद गुलफामची कटघर पोलिसांनी कठोर चौकशी केली, ज्यात त्याने हत्येची संपूर्ण कबुली दिली. पोलिसांनी न्यायालयाकडून आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड (PCR) मिळवली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…
  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं
  • IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर, कोलंबो टेस्टमध्ये एक निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in