• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बर्थडेसाठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसह गाठली दुबई, पण डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच.. नेमकं काय घडलं ?

June 29, 2026 by admin Leave a Comment


Jasmine Bhasin Hospitalised : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन हिचा नुकताच वाढदिवस झाला. 28 जून रोजी तिने 36 वा वाढदिवस साजरा केला; या निमित्ताने ती तिच्या पार्टनरसोबत दुबईला गेली होती. मात्र, आपण जे ठरवतो, दरवेळस तसंच घडतं असं नाही ना.. जस्मिनच्या बाबतीतही तसंच काहीस घडलं. कारण हा वाढदिवस जस्मिनसाठी एका वेदनादायी अनुभवात बदलला. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्याऐवजी, पार्टीचा आनंद घेण्याऐवजी, तिचा सगळा दिवस रुग्णालयातच गेला. वाढदिवसाच्या दिवशीच जस्मिन भसीनला दुबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिचा बॉयफ्रेंड, अली गोनीने जस्मिन भसीनचा एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये ती रुग्णालयाच्या बेडवर पडलेली दिसत होती. हे फोटो पाहून चाहते चिंतेत पडले. आता अली गोनीने तिला रुग्णालयात दाखल करण्यामागचे कारण सांगितले असून, तिच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती देणारी एक पोस्टदेखील शेअर केली.

अभिनेता अली गोनी याने इन्स्टाग्रामवर जस्मिनच्या वाढदिवसाचे फोटोही शेअर केले, ज्यामध्ये ती आजारी असूनही हिंमत करून, केक कापताना दिसली. मिळालेल्या माहितीनुसार, जस्मिनला व्हायरल इन्फेक्शन झालं. गेल्या काही दिवसांचा काळ आमच्यासाठी कठीण होता, मात्र सर्वांचे प्रेम आणि प्रार्थनांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं अली गोनीने नमूद केलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝓣𝓱𝓮 𝓐𝓵𝔂 𝓖𝓸𝓷𝓲 (@alygoni)

जस्मिन भसीन रुग्णालयात दाखल

अली गोनीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जस्मिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो होतो; मात्र आयुष्याने अनपेक्षित वळण घेतले आणि आठवणी निर्माण करण्याऐवजी आता रुग्णालयाच्या खोलीत वेळ घालवावा लागला, असं त्याने लिहीलं. ही पोस्ट शेअर करताना अली गोनीने लिहिले, “आपण तुझा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आलो होतो, पण नशिबात काही वेगळंच होत. आनंद साजरा करण्याऐवजी आम्ही आता हॉस्पिटलच्या खोलीत आहोत. तुला वेदनेत पाहणं हा या प्रवासातील सर्वात कठीण अनुभव आहे. तुला पुन्हा निरोगी आणि हसताना पाहण्यासाठी मी आनंदाने कोणतंही सेलिब्रेशन सोडून देईन” असं अलीने जस्मिन हिच्यासाठी लिहीलं.

अलीने दिले हेल्थ अपडेट्स

“जर मी तुमच्या मेसेजेसना किंवा कॉल्सना उत्तर देऊ शकलो नाही, तर कृपया मला माफ करा. सध्या माझं संपूर्ण लक्ष तिच्यासोबत राहण्यावर आहे. तिला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळत आहे, तिची काळजी घेतली जात आहे आणि हळूहळू तिला बरं वाटतंय. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा.  ती लवकरच पुन्हा हसतमुखाने परत येईल.” अशी आशा व्यक्त करत अली गोनी हिने तिच्या प्रकृतीबद्दल अपडेट्स दिल्या.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कंगना राणौतने किसिंग सीन देताना अभिनेत्याच्या ओठांतून काढलेलं रक्त? त्याच अभिनेत्याकडून सत्य समोर, तेव्हा नेमकं काय झालेलं?
  • Chilli Crops: अस्सल देशी उपाय… इतक्या मिरच्या की झाडच वाकणार… कमी खर्चात उत्पादन डबल, कीड आणि रोग बंधार्‍यावरच थांबणार
  • ENG vs NZ : न्यूझीलंडचा मालिका विजय, इंग्लंडला घरात लोळवलं, बेन स्टोक्सचा पराभवाने शेवट
  • ‘भारत-चीन दररोज तीनवेळा आमनेसामने, ऑपरेशन सिंदूर असून संपलले नाही…’ काय म्हणाले लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी?
  • रावणाची गुहा, अशोक वाटिका.. ‘वाँटेड’ फेम अभिनेत्याने दाखवली श्रीलंकेतील आश्चर्यकारक दृश्ये

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in