• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बड्या व्यक्तीच्या मुलासोबत अभिनेत्रीचं अफेअर, लेकीला रंगेहाथ पकडताच वडिलांची टोकाची भूमिका

June 10, 2026 by admin Leave a Comment


‘तुमची मुलगी माझ्या मुलाच्या घरात पडलेली असते आणि…’, मुलाच्या वडिलांनी अशी तक्रार करताच अभिनेत्रीच्या वडिलांना मोठा धक्का बसला. कारण अभिनेत्रीला मुलांसोबत देखील बोलण्याची परवानगी नव्हती. अशात एका बड्या व्यक्तीच्या मुलासोबत अभिनेत्री अफेअर आहे, असं कळताच तिच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आणि त्याची किंमत अभिनेत्रीला मोजावी लागली. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री अलेफिया कपाडिया आहे…

एक काळ असा होता जेव्हा अलेफिया मोठी स्टार होती. ‘जस्ट मोहब्बत’, ‘सीआईडी’, ‘आहट’, ‘रिश्ते’, ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’, यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडिलांमुळे अलेफिया हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं. पण तिच्या स्टारडमच्या मागे तिच्या खासगी आयुष्यातील मोठं सत्य लपलेलं होतं.

अलेफिया 18 वर्षांची होती, तेव्हा तिचं एका मुलासोबत अफेअर होतं. पण दोघांच्या वडिलांना त्यांचं नातं मान्य नव्हतं. अलेफिया हिने सांगितल्यानुसार, दोघांचं नातं मोडण्याचं कारण, धर्म कधीच नव्हता. दोघांचे पालक देखील लिबरल विचारांचे होते. पण त्यांच्या ईगोला ठेच पोहोचली होती, ज्यामुळे दोघांचं नातं मोडलं.

अलेफिया म्हणते, ‘मुलाचे वडील मध्य प्रदेश येथील शक्तीशाली व्यक्ती होते. त्यांनी माझ्या वडिलांना फोन केला आणि असं काही म्हणाले, ज्यामुळे माझे वडील प्रचंड संतापले. ते (मुलाचे वडील) म्हणालेले, तुमची लेक माझ्या मुलाच्या घरात कायम पडलेली असते. तुम्हाला माहिती आहे दोघांचं अफेअर सुरु आहे? तुमच्या मुलीसाठी माझ्या घरात कोणतीच जागा नाही. तुमच्या मुलीची समज घाला, नाहीतर चांगलं होणार नाही.’

‘हे ऐकल्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या जोरात कानशिलात लगावली. ती कानशिलात माझ्या आयुष्यातील सर्वात जोरात मारलेली कानशिलात होती, मला मुलांसोबत बोलण्याची परवानगी नव्हती. अशात, जेव्हा त्यांना कळलं की माझं अफेअर सुरु आहे, त्यांचं स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही. वडिलांनी मला खूप मारलं.

पुढे अलेफिया म्हणाली, ‘वडिलांनी मला असं मारणं योग्य नव्हतं… कोणत्याच नात्यात भीती नसायला पाहिजे… आज देखील माझे माझ्या वडिलांसोबत मतभेद आहेत.’, अलेफिया हिच्यासोबत घडलेली भयानक गोष्ट म्हणजे, अलेफिया हिचं लग्न दुबई येथील एका मुस्लिम व्यक्तीसोबत करण्यात आलं. जो तिच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठा होता. अलेफिया हिचा लग्नाला नकार होता, पण वडिलांच्या विरोधात जाण्याची तिची हिंमत नव्हती.

अलेफिया लग्नासाठी तयार नव्हती, एवढंच नाही तर, समोरची व्यक्ती देखील लग्नासाठी तयार नव्हती… आई – वडिलांच्या बळजबरीमुळे दोघांचं लग्न झालं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर अलेफिया हिने त्या व्यक्तीला घटस्फोट दिला. आज अभिनेत्री स्वतःचं आनंदी आयुष्य जगत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in