• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बड्या नेत्याचे काळे कृत्य… मासे तळण्याच्या बहाण्याने करायचा महिलांचं लैंगिक शोषण… 100 एकर जमिनीवर पसरलाय अय्याशीचा अड्डा

June 15, 2026 by admin Leave a Comment


महिला आता फक्त देशातच नाही तर, त्या राहत असलेल्या परिसरात देखील सुरक्षित नाही… असं नुकताच समोर आलेल्या एका घटनेतून समोर आलं आहे. परिसरातील नेताच महिलांचं लैगिंक शोषण करत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रिपोर्टनुसार, तृणमूल काँग्रेसचा प्रभावशाली नेता रबिउल इस्लाम याच्यावर महिलांना मासे तळण्याच्या बहाण्याने आपल्या आलिशान ‘गार्डन हाऊस’वर बोलावून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. गरिबीतून वर येऊन कोट्यधीश बनलेल्या या नेत्याने केलेल्या अत्याचारांच्या या प्रकारामुळे संपूर्ण बंगाल हादरून गेला आहे.

नेताच ठरला महिलांसाठी मोठा धोका…

बंगाल येथील देगंगा पंचायत समिती येथील नेता रबिउल इस्लाम परिसरातील कोणत्या दहशतवाद्यापेक्षा कमी नव्हता… स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रबिउल इस्लाम याचं स्वतःचं एक भव्य असं गार्डन आहे, जो जवळपास 100 एकर परिसरात पसरलेला आहे. नेत्यावर आरोप असे आहेत की, रबिउल इस्लाम रात्री महिलांना मासे तळण्याच्या बहाण्याने किंवा जेवण बनवण्याच्या बहाण्याने बोलवायचा आणि त्यांच्यावर अमानवीय अत्याचार करायचा. परिसरातील लोक असं देखील सांगतात की, नेत्याचा दबाव इतका होता की, महिला किंवा त्यांचे कुटुंबिय काहीच बोलायचे नाहीत.

नेत्याचा 10 कोटींपर्यंतचा प्रवास

रबिउल इस्लाम याचं आयुष्य गुन्ह्यांप्रमाणेच थक्क करणारं आहे. 2011 पूर्वी, रबिउल हा पोटाची भूक भागवण्यासाठी धडपडणारा एक सामान्य रोजंदारी मजूर होता. मात्र, सत्तेच्या रिंगणात प्रवेश मिळताच त्याचं नशीब पूर्णपणे बदललं. अल्पावधीतच तो देगंगा पंचायत समितीच्या वन आणि भूमी विभागाचा प्रभावशाली अधीक्षक बनला. सरकारी प्रकल्पांसाठी असलेल्या निधीचा आणि झाडांचा गैरवापर करून स्वतःचं खाजगी ‘गार्डन हाऊस’ सजवल्याचा त्याच्यावर आरोप आहे; आज या मालमत्तेचे मूल्य 10 कोटी रुपये इतकं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून रबिउल याने आपल्या प्रभावाचा वापर करून कायद्याचं उल्लंघन केलं. खंडणी, महिलांवर अत्याचार, अनेक अनेक गुन्हे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पण राजकीय घडामोडींमुळे परिस्थिती बदलताच रबिउल याच्या अडचणीत देखील मोठी वाढ झाली.

रिपोर्टनुसार, अटकेपासून वाचण्यासाठी रबिउल बांगलादेशच्या सीमेपलीकडे पळून जाण्याचा कट रचत होता. पण, त्याचा हा डाव फसला; एका सतर्क पोलीस पथकाने त्याला बशीरहाट सीमेवर पकडलं. तो सध्या कारागृहात असून, तपास यंत्रणा त्याच्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : महिला जातील यशाच्या शिखरावर, आचार्य चाणक्य यांच्या 4 संदेशाकडे कधीच करू नका दुर्लक्ष!
  • फक्त 3.50 लाखांपासून किंमत! 26 किमी मायलेज देणाऱ्या देशातील ‘8’ सर्वात स्वस्त गाड्या; बघा फीचर्स
  • 9000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला हा वनप्लस स्मार्टफोन मोठ्या सवलतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर
  • Kriti Sanon : कृती सेनला राहुल गांधींचा पाठिंबा, ट्रोल करणाऱ्यांना थेट सुनावलं, म्हणाले महिलांनी काय परिधान करावं…
  • धक्कादायक! ‘या’ तीन औषधांमुळे निर्माण होऊ शकतो कॅन्सरचा धोका, जागतिक आरोग्य संघटनेने दिला गंभीर इशारा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in