• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बँक कर्मचाऱ्याचा बंद खोलीत सापडला मृतदेह; संशयास्पद मृत्यूने सहकाऱ्यांमध्ये खळबळ

August 2, 2026 by admin Leave a Comment


उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुरादाबादच्या हिमगिरी कॉलनीत एका बंद खोलीत 26 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणी बँक कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. तिचा मृतदेह भाड्याच्या खोलीत आढळला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा राणा असे मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या सहकाऱ्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला. त्यानंतर तिला फोन देखील केले. परंतु तिनेही काही उत्तर दिलं नाही. त्यामुळे काहीतरी विपरीत घडल्याचा सहकाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तरुणीच्या नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यानंतर दरवाजा उघडला. त्यावेळी प्रतिभाचा मृतदेह घरात आढळून आला. पोलिसांन त्यानंतर तातडीने मृतदेह ताब्यात घेतला. तसेच घटनेचा पंचनामा केला.

तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे. मृत तरुणीचा मोबाईल फोन आणि तिच्या वस्तूची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी मृत तरुणीच्या बँक सहकारी, घर मालक आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी सुरू केली आहे. परंतु तिला मानसिक ताण असल्याचे कोणीही सांगितले नाही.

तरुणीच्या मृत्यूने खळबळ 

तरुणीच्या मृत्यूने आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दररोज दिसणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यूने शेजाऱ्यांना धक्का बसला आहे. अनेक जण या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. पोलीस अधिकारी कुमार रणविजय सिंह यांनी 112 हेल्पलाइन क्रमांकावरून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांच्या समोर घराचा दरवाजा उघडला. ती घरात मृत अवस्थेत आढळली. घरात तरुणीची कोणतीही शेवटची चिठ्ठी सापडलेली नाही. तरुणीचाा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर मृत्यूचे खरं कारण समोर येणार आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणाच्या तपासाची दिशा स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिसांना तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय आहे. परंतु तिच्या मृत्यूचे अधिकृत कारण पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येईल. पोलिसांनी स्थानिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सुभाष चंद्रांच्या आरोपांवर रिलायन्सची पहिली प्रतिक्रिया, चुकीच्या अफवा पसरवल्याच्या आरोपांवर भाष्य
  • विवोचा Y31t 5G फोन भारतात दाखल, 7200mAh ची तगडी बॅटरी, किंमत किती ?
  • ही वस्तू महिन्यातून फक्त एकदा जाळा, साप घरातच काय पुन्हा परिसरात सुद्धा येणार नाहीत
  • Mamata Banerjee : … तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाईन, ममता बॅनर्जींचा भाजपला थेट इशारा
  • मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in