• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फ्लिपकार्टवर आजपासून HMD Vibe 2 5G ची विक्री सुरू, बँक कार्डद्वारे मिळवा 2 हजार रुपयांची सूट

June 16, 2026 by admin Leave a Comment


एचएमडीचा नवीन स्मार्टफोन HMD Vibe 2 5G गेल्या महिन्यात 4GB/64GB आणि 4GB/128GB या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला होता. अशातच या फोनच्या वाढत्या मागणीनुसार भारतीय बाजारपेठेत या कंपनीचा 16 जून रोजी दुपारी 12 वाजता 6GB/128GB व्हेरिएंट लाँच केला आहे. त्यात हा फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध देखील केला आहे. जर तुम्ही 15 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीचा 5जी फोन शोधत असाल, तर तुम्हाला हा फोन 6000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि एचडी रिझोल्यूशन डिस्प्लेसह खरेदी करता येणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण 6GB/128GB व्हेरिएंट असलेल्या HMD Vibe 2 5G ची किंमत जाणून घेऊयात.

भारतातील HMD Vibe 2 5G ची किंमत

HMD Vibe 2 5G या फोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16 हजार 999 रूपये आहे. बँक ऑफर्सचा फायदा घेतल्यानंतर तुम्हाला हा फोन 14 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे, म्हणजेच तुम्ही हा फोन 2 हजार रुपयांनी कमी किमतीत खरेदी करू शकाल.

या डिव्हाइसचा 4GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. HMD Vibe 2 5G चा 4GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट 14 हजार 999 मध्ये उपलब्ध आहे, पण 2 हजार रूपयांच्या बँक कार्ड डिस्काउंटनंतर तो तुम्हाला 12 हजार 999 मध्ये खरेदी करता येणार आहे. SBI, HDFC, ICICI आणि Axis बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास डिस्काउंट उपलब्ध आहे. हा फोन OPPO K14x 5G, POCO M7 Plus 5G आणि Realme P4 Lite 5G सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल.

HMD Vibe 2 5G वैशिष्ट्ये

  • डिस्प्ले: या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि HD+ रिझोल्यूशन असलेला 6.74-इंचाचा डिस्प्ले आहे.
  • चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये ग्राफिक्ससाठी माली G57 MC2 GPU सह 2.3 GHz युनिसॉक T8200 प्रोसेसर वापरला जातो.
  • ओएस: अँड्रॉइड 16 वर चालणाऱ्या या फोनला दोन वर्षांसाठी दर तीन महिन्यांनी सुरक्षा अपडेट्स मिळतील.
  • कॅमेरा: या फोनमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि पुढील बाजूस 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.
  • कनेक्टिव्हिटी: हा फोन 5G, Wi-Fi 802.11ac, GPS, ब्लूटूथ व्हर्जन 5, USB Type-C, GLONASS आणि ड्युअल 4G VoLTE ला सपोर्ट करतो. सुरक्षेसाठी, या डिव्हाइसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
  • बॅटरी: 6000 mAh बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कार 8 लाखांची, पण बिल 10 लाखांचे? जाणून घ्या एक्स-शोरूम आणि ऑन-रोड किंमतींमधील खरा फरक
  • BSNLचा ‘हा’ आहे ऑल इन वन प्लॅन, दररोज 3 जीबी हाय स्पीड डेटा आणि अमर्यादित कॉलिंग
  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in