
फ्रेंच ओपन 2026 स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. महिला एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोलँडची 24 वर्षीय टेनिस स्टार माजा ख्वालिंस्का पोहोचली आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. (Photo: Getty Images)
पोलँडची माजा ख्वालिंस्का फ्रेंच ओपन महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी पहिली क्वॉलिफायर आहे. म्हणजेच या स्पर्धेसाठी पात्र होण्यासाठी आधी पात्रता फेरीत खेळली. मग पात्र ठरली आणि आता अंतिम फेरी गाठली आहे. (Photo: Getty Images)
ओपन एरामध्ये माजा ख्वालिंस्का एक क्वॉलिफायर म्हणून महिला एकेरीत अंतिम फेरी गाठणारी दुसरी महिला आहे. एम्मा राडुसानूने 2021 च्या यूएस ओपन एकेरीच्या फेरीत पात्रता फेरीत अंतिम सामना असा प्रवास केला होता. (Photo: Getty Images)
24 वर्षी टेनिस स्टार माजा ख्वालिंस्का हीने रशियाच्या डायन श्नायडरला पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे. आता जेतेपदासाठी तिचा सामना मीरा आंद्रीवाशी होईल. तिने उपांत्य फेरीत युक्रेनच्या मार्टा कोस्त्युकाला हीला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. मीरानेही पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. (Photo: Getty Images)
फ्रेंच ओपन 2026 स्पर्धेच्या सुरूवातील माजा ख्वालिंस्का महिला एकेरी जागतिक क्रमवारीत 114 व्या स्थानी होती. जर तिने फ्रेंच ओपन जिंकली तर क्रमावारीत 100 स्थानांची झेप घेत 14व्या स्थानी येईल. (Photo: Getty Images)




Leave a Reply