• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

फणसामध्ये आणि त्याच्या बियांमधील ‘हे’ जीवनसत्त्वे आणि खनिजे आरोग्याला देतात अनेक फायदे

June 16, 2026 by admin Leave a Comment


उन्हाळ्यात फणसाचे देखील मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. तर कच्च्या फणसापासून भाजी बनवली जाते, जी चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच पिकलेल्या फणसाच्या गऱ्यामधील बिया देखील पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही फणसाच्या बियांचा तुमच्या आहारात कसा समावेश करू शकता, त्यामध्ये किती जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत आणि त्या तुमच्या आरोग्यासाठी कशा फायदेशीर ठरू शकतात. फणसाच्या बियांमध्ये त्याच्या गरासोबतच जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’, कॅल्शियम आणि लोह असते. ही सर्व पोषक तत्वे निरोगी शरीर राखण्यासाठी आवश्यक आहेत. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

फणसाच्या बियांमधील पोषक तत्वे

हेल्थलाइननुसार 100 ग्रॅम फणसाच्या बियांमध्ये 0.43 ग्रॅम प्रथिने, 1.5 ग्रॅम फायबर, 10 ते 17 आययू व्हिटॅमिन ए, 11 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी, 50 मिलिग्रॅम कॅल्शियम, 54 मिलिग्रॅम मॅग्नेशियम, 1.5 मिलिग्रॅम लोह आणि 264 मिलिग्रॅम पोटॅशियम असते. तसेच, त्यात बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स, थायमिन आणि रायबोफ्लेविन यांचाही स्रोत असतो. याशिवाय त्यात इतर अनेक संयुगे देखील आढळतात. हे सर्व पोषक तत्वे आपल्याला बियांचे सेवन केल्यास शरीराला मिळतात.

फणसामध्ये किती पोषक तत्वे असतात?

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते 165 ग्रॅम किंवा अंदाजे 1 कप, फणसाच्या गऱ्यांमध्ये 2.84 ग्रॅम प्रथिने, 2.48 ग्रॅम फायबर, 39.6 मिग्रॅ कॅल्शियम, 47.8 मिग्रॅ मॅग्नेशियम तर आहेच, शिवाय 739 मिग्रॅ पोटॅशियम, 34.6 मिग्रॅ फॉस्फरस, तसेच 22.6 मिग्रॅ व्हिटॅमिन सी, 1.52 मिग्रॅ नियासिन, 39.6 मायक्रोग्रॅम फोलेट आणि 8.25 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन ए असते.

आपल्या आहारात फणासाच्या बियांचा समावेश कसा करावा?

तुमच्या आहारात फणसाच्या बियांचा समावेश करणे अत्यंत सोपे आहे. तुम्ही त्याची सुकी भाजी बनवू शकता. तुम्ही त्याचे चिप्स बनवून एअर-फ्राय करू शकता. तुम्ही बिया बारीक चिरून सॅलड किंवा सूपमध्ये घालू शकता. फणसाच्या बिया, लसूण, लिंबाचा रस, तिळाची पेस्ट आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून तुम्ही हुमुस बनवू शकता. एवढेच नाहीतर सर्वात सोपे म्हणजे या बिया उकडवून देखील त्याचे सेवन करू शकता.

फणसाच्या बियांचे फायदे

PubMed मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार फणसाच्या बियांचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. त्या ग्लुकोज सहनशीलता सुधारतात, ज्यामुळे त्या मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतात. फणसाच्या बियांमुळे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड आणि लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यासही मदत होते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, जे त्वचेचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास उपयुक्त ठरते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharshtra News LIVE : धाराशिवच्या विकासाला राजकीय कुरघोडीचा फटका
  • Govinda: गोविंदा करणार दुसरे लग्न? कुटुंबातील व्यक्तीने दिली मोठी अपडेट
  • Horoscope Today 25th August 2026 : कोणासाठी खुलणार यशाचं नवं दार ? वाचा तुमचं भविष्य
  • सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
  • अभिजीत दिपके यांची थेट उडवली या अभिनेत्रीने खिल्ली, त्याची इंग्रजी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in