
बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रोशनी वालिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. विशेषतः तिच्या आईकडून मिळणाऱ्या अनोख्या आणि मोकळ्या विचारांच्या सल्ल्यांमुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
रोशनी वालिया हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, तिची आई खूपच मनमोकळ्या विचारांची आहे. ती रोशनीला केवळ करिअरमध्येच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही स्वतःचे निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन देते.
रोशनीच्या मते, तिची आई तिला आयुष्य एन्जॉय करण्यासाठी, मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी आणि पार्ट्यांना जाण्यासाठी प्रोत्साहित करते. यासोबतच सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचाही सल्ला देते.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, मोठ्यांच्या सहवासात काम केल्यामुळे तिला इंडस्ट्रीतील बारकावे आणि पडद्यामागील वास्तव लवकर समजलं. रोशनीने तिच्या यशाचं संपूर्ण श्रेय आईला दिलं आहे. तिच्या आईने मुलीच्या स्वप्नांसाठी स्वतःचं शहर सोडून मुंबई येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
रोशनी सांगते की, तिच्या आईने कधीही तिच्यावर बंधने घातली नाहीत. रोशनीने सांगितलं की, तिची आई तिला आणि तिच्या बहिणीला नेहमीच सुरक्षित राहण्याचा सल्ला देते आणि आवश्यक ती काळजी घेण्याबाबत स्पष्टपणे बोलते. हा विषय अनेकांसाठी धक्कादायक असला तरी रोशनीच्या मते हा एक जबाबदार आणि वास्तववादी दृष्टिकोन आहे.




Leave a Reply