• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रेम, वेदना आणि सुफियाना अंदाज… निधनानंतर सुपरहीट झाली Nusrat Fateh Ali Khan यांची 38 वर्ष जुनी कव्वाली

August 2, 2026 by admin Leave a Comment


जूनं ते सोनं म्हणतात, ते खरंच आहे… आज अनेक गाणी कव्वाली रसिकांच्या भेटीस येतात. पण काही गोष्टी कालकारंना अशा तयार केल्या आहेत, ज्यांची जागा आज कोणीच घेऊ शकत नाही… अशीच एक कव्वाली नुसरत फतेह अली खान (Nushrat Fateh Ali Khan) यांची आहे. पाकिस्तानचे लोकप्रिय गायक नुसरत फतेह अली खान (Nushrat Fateh Ali Khan) यांच्या कव्वालीची क्रेझ आज देखील चाहत्यांमध्ये आहे. त्यांनी रचलेले असे अनेक गाणी आहेत, जे बॉलिवूडने रीक्रिएट केले आहेत.

17  मिनिटांची कव्वाली…

सध्या नुसरत फतेह अली खान यांच्या त्या कव्वालीची चर्चा रंगली आहे, जी कलाकाराने जवळपास चार दशकांपूर्वी गायली होती; तरीही ती आजही रोमँटिक गाणी आवडणाऱ्यांच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून समाविष्ट असते. या कव्वालीचं मूळ रूप साधारणपणे 17 मिनिटांच असलं, तरी बॉलीवूडने तिची Recreated Versions तयार केली आहेत.

38 वर्षांनंतर देखील सुपरहीट ठरतेय कव्वाली…

या कव्वालीचे लिरिक्स, धून, कंपोझिशन इतके शानदार आहेत की, 38 वर्षांनंतर देखील अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. नुसरत फतेह अली खान याच्या ज्या कवालीची सध्या चर्चा रंगली आहे, त्या कव्वालीचं नाव मेरे रश्के कमर (Mere Rashke Qamar) आहे. ही कव्वाली 1988 मध्ये तयार करण्यात आलेली आणि नुसरत यांनी कंपोज केलं होतं. या उर्दू गझल-कव्वालीबद्दल सांगायचं झालं तर, ती फना बुलंदशहरी यांनी लिहिली होती.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही कव्वाली नुसरत फतेही अली खान हयात असताना लोकप्रिय झाली नाही. पण अनेक वर्षांनंतर जबरदस्त कल्ट क्लासिक म्हणून उदयास आली. जेव्हा टी-सीरीजने 2017 मधील ‘बादशाहो’ या बॉलीवूड सिनेमासाठी त्यांचा पुतण्या राहत फतेह अली खानच्या आवाजात हे गाणं पुन्हा तयार केलं, तेव्हा ते सुपरहीट ठरलं. हे गाणे अजय देवगण आणि इलियाना डिक्रूझ यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं.

नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्यांबद्दल सांगायचं झालं तर, दयारे इश्क में अपना मकाम पैदा कर, तुम इक गोरखधंधा हो, दमादम मस्त क़लन्दर, हिजाब को बेनकाब होना था, छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिला के, आपसे मिलकर हम कुछ बदल से गए… यांसारखी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार
  • मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in