• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रियांका गांधी म्हणाल्या, कैसे हो? नरेंद्र मोदी यांनी थेट म्हटले..

August 12, 2026 by admin Leave a Comment


खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचे रिसेप्शन दिल्लीत झाले. या रिसेप्शनला देशभरातील नेत्यांनी हजेरी लावली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 20 मिनिटे या रिसेप्शनमध्ये होते. यासोबतच अमित शाह देखील पोहोचले. मात्र, ज्यावेळी अमित शाह पोहोचले, त्याचवेळी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी अगोदरच उपस्थित होते. मात्र, यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले आणि पुढे निघून गेले. अमित शाह पुढे निघाल्यानंतर राहुल गांधीही मागे थोड्यावेळात निघाले. मात्र, अमित शाह आणि राहुल गांधी एकाच वेळी रिसेप्शनला पोहोचल्याने विविध चर्चा या रंगताना दिसल्या. या रिसेप्शनमधील विविध फोटो आणि व्हिडीओ पुढे येत आहेत. त्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकमेकांच्या शेजारी बसून गप्पा मारताना दिसत आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शनमधील एक खास व्हिडीओ पुढे आला. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे दिसत आहेत. प्रियंका गांधी यांना बघताच नरेंद्र मोदी यांनी विचारले की, कशा आहात? यावर प्रियंका गांधी यांनी उत्तर दिले की, ठीक आहे सर.. तुम्ही कसे आहात?

यावर नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, नेहमीसारखाच आहे.. यावर खर्गे यांनी नरेंद्र मोदी यांना म्हटले की, तुम्ही थोडे बदलले आहात… यावर नरेंद्र मोदी हसत म्हणतात की, खरंच? यावर हसत नरेंद्र मोदी पुढे निघून जाताना दिसत आहेत. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. खर्गे यांनी नरेंद्र मोदींना तुम्ही बदलले म्हणताच उपस्थित सर्वजण हसताना दिसले.

सुप्रिया सुले की बेटी के वैवाहिक कार्यक्रम में कांग्रेस के वरिष्ठ नेता मल्लिकार्जुन खड़गे जी ने मोदी जी के मजे ले लिए।😂

नरेंद्र मोदी जी – और प्रियंका कैसी हैं आप?

प्रियंका गांधी – अच्छी हूं सर! आप कैसे हैं?

नरेंद्र मोदी जी – मैं तो वैसा ही हूं। 😀

खड़गे जी – भाई साहब थोड़ा… pic.twitter.com/JSRJ8tqq10

— MANISH YADAV लालू (@ManishPDA) August 12, 2026

यावेळी शेजारी बरेच लोक दिसत आहेत. नरेंद्र मोदी जात असताना त्यांना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दिसतात. यावेळी त्यांनी विचारपूस केली. राज्यात बड्या नेत्यांकडून सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्यासोबत पवार कुटुंबिय गप्पा मारताना दिसले.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sugar Rate: मला साखर खूप महाग व्हावी असे वाटते… भाजपच्या मंत्र्याचे साखरेच्या किमतींवर वादग्रस्त विधान
  • Horoscope Today 27th August 2026 : या राशींचे नशीब आज घेणार मोठी कलाटणी, ग्रह-ताऱ्यांची साथ कोणाला ? वाचा 12 राशींचं आजचं भविष्य
  • खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…
  • Jayant Patil: पक्ष बदलाच्या चर्चा अन् भर सभेत जयंत पाटील यांचे बेधडक उत्तर, म्हणाले…
  • Dharashiv Politics : ओमराजे निंबाळकरांनी पक्ष बदलताच गेम फिरला, धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरसेवक फुटले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in