• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्राजक्ता माळीच्या वेब सीरिजचा वाद पोहोचला थेट विधानसभेत; आशिष शेलारांचा मोठा निर्णय

July 11, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता अंकुश चौधरी आणि प्राजक्त माळी यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘देवखेळ’ ही वेब सीरिज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोकणातील शंकासूर आणि त्याचे खेळ यांवर आधारित ‘देवखेळ’ ही वेब सीरिज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. कोकणातील श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या शंकासूर देवतेचं आक्षेपार्ह चित्रण केल्याचा आरोप त्यावर करण्यात आला आहे. या सीरिजचा हा मुद्दा आता थेट विधानसभेत पोहोचला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ‘देवखेळ’ या वेब सीरिजचा मुद्दा उपस्थित केला. या सीरिजविरोधात आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

‘देवखेळ’ या वेब सीरिजला कोकणवासियांनी आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला होता. कोकणातील शिमगोत्सवातील अत्यंत श्रद्धेय मानलं जाणारं दैवत ‘शंकासूर’ यांचं चुकीचं आणि अपमानास्पद चित्रण करण्यात आल्याच आरोप आहे. आमदार भास्कर जाधव यांनी या वेब सीरिजवर थेट बंदीची मागणी केली होती. सीरिजमध्ये शंकासूराला लोकांची हत्या करणारा गुन्हेगार म्हणून दाखवल्यामुळे कोकणातील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. कोकणातील शंकासुराच्या परंपरेचं विद्रुपीकरण होत असल्याचा आक्षेप स्थानिकांनी घेतला आहे.

आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र

झी 5 वरिल “देवखेळे” या वेबसिरिज मुळे महाराष्ट्र शासन जतन संवर्धन करीत असलेल्या “नमन-खेळे” या पौराणिक व खूप जुन्या हिंदू लोककलेला व परंपरेला धक्का लागला असल्याची जनमानसात भावना तीव्र दिसून येत आहे. त्या विरोधात कोकणात रोष वाढत असून वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणीने जोर धरला आहे.… pic.twitter.com/agqqWiJHxN

— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 7, 2026

या वेब सीरिजविषयी आशिष शेलार विधानसभेत म्हणाले, “शंकासूर ही फक्त लोककलेतील व्यक्तिरेखा नसून अनेकांसाठी हा श्रद्धेचा विषय आहे. लोकपरंपरेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याची परंपरा वेगळी आहे. मात्र श्रद्धास्थानाचा विपर्यास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. यासंदर्भात अनेक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची निवेदनं प्राप्त झाली असून या प्रकरणात योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल. तसंच या विषयाची माहिती केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयालाही देण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.”

श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा खेळ अत्यंत रहस्यमयी पद्धतीने ‘देवखेळ’ या वेब सीरिजमध्ये साकारण्यात आला आहे. शंकासूर हा असूर म्हणजेच राक्षस असला तरी कोकणात त्याची देवरुपात पूजा होते. पाप करणाऱ्यांना, अन्याय करणाऱ्यांना तो शिक्षा देतो, अशी मान्यता आहे. या सीरिजमध्ये अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी, मंगेश देसाई, वीणा जामकर, यतीन कार्येकर आणि ‘गाव गाता गजाली’ फेम रोहन सुर्वे यांच्या भूमिका आहेत.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…
  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं
  • IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर, कोलंबो टेस्टमध्ये एक निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in