• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्राचीन विष्णू मंदिराचं रहस्य उलगडणाऱ्या ‘नागबंधम’चा ट्रेलर; महेश मांजरेकरांचीच जोरदार चर्चा

June 21, 2026 by admin Leave a Comment


बहुचर्चित दाक्षिणात्य चित्रपट ‘नागबंधम’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा सुरू आहे. मूळ तेलुगू भाषेत बनलेल्या या चित्रपटाला पॅन इंडियामध्ये प्रदर्शित केलं जाणार आहे. हा अॅक्शन अॅडव्हेंजर आणि फँटसी चित्रपट भारतातील प्राचीन विष्णू मंदिरांमधील ‘नागबंधम’ या गूढ विधीवर आणि त्याच्याशी संबंधित रहस्यमयी आख्यायिकांवर आधारित आहे. याचीच एक झलक या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. ‘नागबंधन’चा ट्रेलर अक्षरश: अंगावर शहारे आणणारा आहे.

देशातील प्राचीन विष्णू मंदिरांमध्ये दडलेली रहस्ये आणि परंपरा याच्याशी संबंधित कथा ‘नागबंधम’मध्ये पहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये दमदार अॅक्शन, भव्यदिव्य दृश्ये आणि प्रभावी व्हीएफएक्स पहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत कोणताही मोठा स्टार नाही. तरीही दमदार संवाद आणि उत्कृष्ट अॅक्शन सीक्वेन्समुळे हा ट्रेलर प्रभावी ठरतेय. “जेव्हा अधर्म सर्व मर्यादा ओलांडतो, तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी ब्रह्म भगवान अवतार घेतात..”, यांसारखे अनेक दमदार संवाद या ट्रेलरमध्ये आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘नागबंधम’चा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरमध्ये पद्मनाभस्वामी आणि पुरी जगन्नाथ यांसारख्या प्राचीन विष्णू मंदिरांमधील नागबंधमच्या संरक्षक कवचाशी संबंधित कथेची झलक दाखवण्यात आली होती. या ट्रेलरमधील महेश मांजरेकर यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

पहा ट्रेलर

‘नागबंधम’ हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये येत्या 3 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विराट कर्ण आणि नभा नितेश यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ऐश्वर्य मेनन, दक्षा नगरकर, महेश मांजरेकर, जगपती बाबू आणि मुरली शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक नामा यांनी केलं आहे. काल्पनिक आणि पौराणिक कथांवर आधारित दमदार चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांना पॅन इंडिया खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘हनुमान’, ‘कार्तिकेय’ आणि ‘कार्तिकेय 2’ यांसारख्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाला होता. याच यादीत आता ‘नागबंधम’चाही समावेश होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in