• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसिद्ध मंदिरात जवानाच्या रायफलमधून चुकून गोळी सुटली; भाविकांची एकच धावाधाव

July 4, 2026 by admin Leave a Comment


Kashi Vishwanath Temple Fire: वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. मंदिराच्या गेट नंबर 4बी जवळ घडलेल्या एका घटनेने भाविकांची एक धावाधाव झाली. पीएसीच्या एका जवानाच्या कार्बाइन उर्फ रायफलमधून  अचानक गोळी सुटली. कार्बाइनमधून सुटलेली गोळी जमिनीला आदळून तिघांना लागली. यामुळे तिघे जखमी झाली. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मंदिरात कर्तव्यावर तैनात असलेला पीएसी जवानाच्या हातात असलेली कार्बाइन जमिनीवर पडली. त्यानंतर या कार्बाइनमधून गोळी सुटली. ही गोळी जमिनीवर दगडाला आदळली. त्यानंतर दगड थेट भाविकांना लागले, असे सांंगितले जात आहे. मंदिरात जखमी झालेल्या भाविकांची नावे देखील हाती आली आहेत. निक्की गुप्ता, राम बाबू आणि विकास यादव अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या घटनेने काही वेळ मंदिरात खळबळ माजली होती. त्यानंतर तातडीने पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी जवान घटनास्थळी पोहोचले.

अफवांवर विश्वास ठेवू नका : पोलीस 

प्राथमिक तपासात कार्बाइन जमिनीवर आदळल्याने घटना घडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित सुरक्षा एजन्सीची चौकशी सुरू केली आहे. तसेच ही घटना कशी घडली, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. घटनेनंतरही मंदिर परिसरात सुरक्षा सामान्य आहे. तसेच मंदिरात दर्शन कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे. भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांना केलं.

नेमकी घटना कशी घडली?

पोलीस अधिकारी गौरव बंसवाल यांनी सांगितलं की, मंदिर परिसरात पीएसीच्या जवानाच्या हातातून कार्बाइन सुटली. कार्बाइन जमिनीवर आदळल्याने दोन राऊंड फायर झाले. गोळ्या जमिनींना आदळून मंदिरातील फुलविक्रेत्यांना लागल्या. यामुळे एकाचा हाताला, दुसऱ्याच्या कमरेला आणि तिसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे. या घटनेत तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. फुलविक्रेते फार गंभीर जखमी झालेले नाहीत. त्यांच्यावर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sandeep Deshpande | अमित साटमांना निर्लज्जांचे शिरोमणी पुरस्कार द्या! मनसेचा संताप; राजीनामा द्या, नाहीतर पदावरून हटवा
  • मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात हिंदू दिग्दर्शक जेव्हा म्हणाला, ‘ऐ मोटी, I Love You यार, मुझसे…’ पुढे जे झालं ते…
  • Sanjay Raut on Ram Mandir : प्रभू श्रीरामांच्या आभूषणांवरही डल्ला , मंदिर ट्र्स्ट बरखास्त करा, ट्रस्टवर गुन्हा दाखल करा; संजय राऊत कडाडले
  • Mumbai Rain Updates : संकटाचे ढग मुंबईपर्यंत… मुंबईतही शाळा, महाविद्यालयांना तडकाफडकी सुट्ट्या जाहीर; रेड अलर्ट येताच प्रशासन सतर्क
  • 24 तास दारूच्या नशेत असायची ही बॉलिवूड अभिनेत्री, जिच्यावर झालेले लेस्बियन असल्याचे आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in