• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसाद लाड मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला, भेटीपूर्वीच म्हणाले, मी एक..

May 22, 2026 by admin Leave a Comment


भाजपा आमदार प्रसाद लाड मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना भेटीस आमंत्रित केले होते. या भेटीपूर्वी बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटले की, मनोज जरांगे यांनी इशारा दिल्यानंतर मी काही गोष्टी बोललो होतो, त्यामध्ये माझी प्रमुख भूमिका होती की, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये. त्यांनी केलेल्या कामाची गणणा देखील त्यांनी समोर ठेवावी. त्यानंतर त्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी प्रसारमाध्यमातून प्रसाद लाड मला मराठा म्हणून भेटायला आले तर मला निश्चितपणे भेटायला आवडेल, ही भूमिका त्यांनी मांडली. 23 तारखेपर्यंत त्यांनी प्रसाद लाड यांनी मला भेटायला यावे, असे म्हटले. मराठा समाजासाठी किती कामे केली. 2017 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता देवेंद्र फडणवीस यांनी काय काय केले, याला प्रतिसाद म्हणून त्यांनी मला निमंत्रित केले. मनोज जरांगे यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीला आमंत्रित केले नव्हते.

मराठा समाजाचा भाऊ म्हणून त्यांनी मला नियंत्रित केले. त्यांनी म्हटले की, आम्ही त्याला आमचा समाज बांधव म्हणून निमंत्रित करतो. आज मी इथे मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून इथे आलोय. मराठा समाजाचा बांधव म्हणून आज मी इथे आलोय. कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही कमी पडतोय. कोणत्या गोष्टीची अपेक्षा मनोज जरांगे यांची होती आणि ती पूर्ण होत नाही, याच्यावर मी आज त्यांच्याशी चर्चा करायला आलोय.

पुढे बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटले की, निश्चितपणे एक मराठा समाजाचा कार्यकर्ता, बांधव म्हणून मी निश्चितपणे त्यांच्यासोबत चर्चा करेल. आज मी इथे त्यांच्याकडे जात असताना भापजाचा आमदार नेता म्हणून जात नाही तर मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून जाणार आहे. मी त्यांच्या काही गोष्टी समजून घेणार आहे. मनोज जरांगे यांनी सरकारने ज्या गोष्टी केल्या आहेत, त्या गोष्टी दाखवणार आहे.

मी अनेक 100 पानाची कागदपत्रे आणली आहेत, ती मी त्यांना दाखवणार आहे. समाजाच्या मुलांकरिता सरकारने काय केले. एकनाथ शिंदे यांनी काय केले, देवेंद्र फडणवीसांनी काय केले आणि काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी केले नाही हे देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. कारण प्रत्येकवेळी आरोप होतात, त्यावेळी फक्त देवेद्र फडणवीस यांच्यावर होतात. का आरोप केले जातात का तर मराठा नाही म्हणून केले जातात का? ही भूमिका देखील मला खोडून काढायची आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुदिन्याचे आरोग्यदायी फायदे ॲसिडिटी, पोटफुगी आणि पचनाच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय
  • श्रद्धा कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘ईठा’ चित्रपटाच्या नावावर आक्षेप, राष्ट्रवादी चित्रपट विभागाची मागणी काय?
  • IPL 2027: ऋषभ पंत संघातून आऊट होताच लखनौ सुपर जायंट्सचा असा गेम, या खेळाडूकडे कर्णधारपद देणार!
  • दुर्गंधी सुटली म्हणून लोक टेरेसवर पळाले, कोपऱ्यातील गोणी उघडताच… चार दिवसानंतर सत्य आलं बाहेर; नाशिक हादरलं
  • विधानभवनाबाबत चकित करणारी माहिती! थेट प्रसाधनगृहाबाहेर ठेवलाय शिपाई; अधिकाऱ्यांनाही…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in