• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रसाद लाड कुठेही दिसो कानशिलात लगावणार… राज्यातील बडा ओबीसी नेता आक्रमक, थेट..

August 7, 2026 by admin Leave a Comment


मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली म्हणून त्यांच्यावर टीका करणाऱ्या प्रसाद लाड यांची मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलही बोलण्याची भाषा बदलली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर जरांगे यांनी चर्चेसाठी बोलावल्यावर तिथे प्रसाद लाड गेले. यादरम्यान त्यांना मराठा आंदोलकांकडून धमक्या दिल्या जात होत्या. जरांगे यांच्यासोबत प्रसाद लाड यांनी चर्चा केली. त्यानंतर सातत्याने मराठा आरक्षणाबद्दल बोलताना प्रसाद लाड दिसत आहेत. आता ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका प्रसाद लाड यांच्यावर केली. फक्त टीकाच नाही तर TV9 ला बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, प्रसाद लाड मला कुठेही दिसो… त्याच्या कानाखाली मारल्याशिवाय राहणार नाही.

लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, प्रसाद लाड जिथे कुठे दिसले, त्याच्या कानशिलात लगावणार आहे. यादरम्यान ते वारंवार प्रसाद लाड यांच्या कानशिलात लगावणार असल्याचा इशारा देताना दिसले. लक्ष्मण हाके म्हणाले, प्रसाद लाड ज्या ज्या ठिकाणी दिसतील पहिल्यांदा मी त्यांच्या कानशिलात लगावणार. मला गोळ्या घाला जेलमध्ये टाका… मी त्याला कानशीलात लगावणार.

प्रसाद लाड म्हणतात यांच्या मागे माणसे आहेत, तुला माझ्या मागची माणसे बघायची आहेत? असाही सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. विखे सारख्या माणसाला ही भाषा शोभते का? ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल, असाही मोठा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. विखेंना आरक्षणाच काय कळत, असेही म्हणण्यात आले. देवेंद्र फडणवीस तुम्ही प्रसाद लाड यांना आवरा.

आता चॉपर घेतल आहे, कुठे राबायला गेले होते का? मंडल आयोगाला चॅलेंज केल तर पंतप्रधान पण राहणार नाही, मी म्हणतो की, चॅलेंज करून तरी बघा मग तुम्हाला कळेल, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले. लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यासोबत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर
  • IND vs SL: दुसरा दिवसाची शेवट वादग्रस्त, सामन्यात राडा, श्रीलंकन फलंदाजाने थेट ग्लोव्हज काढले अन्…
  • Prajakta Mali: प्राजक्ता माळीवरचा ‘फरसाण’ जोक नेमका कुठून आला? हास्यजत्रेच्या अभिनेत्याने सांगितला सेटवरचा भन्नाट किस्सा
  • इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in