• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही – धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजप खासदाराच्या मुलीची पोस्ट व्हायरल

July 27, 2026 by admin Leave a Comment


ओडिशामधील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) खासदार अपराजिता सारंगी या अडचणीत सापडल्या आहेत. हे प्रकरण त्यांची मुलगा, अर्जिता राहरशी निगडीत आहे. नीट पेपरफुटीच्या मुद्यावरून दिल्लीतील जंतरमंतचरवील आंदोलन आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचं समर्थन तिने केलं होतं. एवढंच नव्हे तर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे स्वागत करणारी पोस्टही तिने सोशल मीडियावर शेअर केल्याने डिशातील भाजपमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.अर्चिताने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत एका पोस्टद्वारे आपला आनंद व्यक्त केला. ती पोस्ट हटवण्यासाठी आपल्यावर प्रचंड दबाव होता, पण आपण तसं करणार नाही, असंही तिने स्पष्ट केलं होतं. मात्र, आता अर्चिताचे खाते बंद (deactivated) करण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण ?

भाजपा खासदार अपारजिता सारंगी यांची मुलगी अर्चिताने पोस्ट केली होती. धर्मेंद्र प्रधान यांचा राष्ट्रीय ध्वजाच्या पार्श्वभूमीवरील फोटो शेअर करत, “NEET पेपरफुटी प्रकरणामुळे उसळलेल्या व्यापक विद्यार्थी आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला,” असे तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने नमूद केलं. मात्र भाजप खासदाराच्या मुलीच्या या पोस्टनंतर पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. असं असंल तरीही, त्यानंतर अपराजिता सारंगी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत धर्मेंद्र प्रधान यांना जाहीर पाठिंबा दर्शविला.

सांरगी यांच्या कारकिर्दीवर होणार परिणाम ?

दरम्यान खासदारांच्या कार्यालयातील सहाय्यक धनेश्वर बारिक यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. अर्चिता ही जनरेशन-झेडमधील आहे आणि ती आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तिला स्वतःचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.” असं म्हणत त्यांनी तिच्या मतप्रदर्शनाच्या अधिकाराचे समर्थन केलं.

मात्र, या वादाचा खासदार अपराजिता सारंगी यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम होईल का, असं विचारण्यात आल असता, “याचं उत्तर काळच देईल,” अशी प्रतिक्रिया बारीक यांनीदिल्याने चर्चांना उधाण आलं. या सर्व घडामोडींनंतर खासदार अर्चिता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

मी ती पोस्ट डिलीट करणार नाही

दरम्यान, सूत्रांनी माहितीनुसार, धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर अपराजिता सारंगी यांनी मुलीला (आधीची) इन्स्टाग्राम पोस्ट हटवण्याची विनंती केली होती. मात्र, अर्चिताने ती हटवण्यास नकार दिला. यानंतर अर्चिताने आणखी मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला. “डीपी (धर्मेंद्र प्रधान) यांच्या पीएंसाठी, जे माझ्या आईला माझी आधीची स्टोरी हटवण्याचा मेसेज नक्कीच पाठवतील (हे यापूर्वीही घडलं आहे) — कृपया असं करू नका. मी ती पोस्ट डिलीटल करणार नाही. जय जगन्नाथ! जय हिंद!” असं तिने लिहीलं . हे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एक वाद सुरू झाला. मात्र सध्या अर्जिता यांचं अकाऊंटच डिॲक्टिव्हेट झालं आहे.

अपराजिता सारंगींचा प्रधानांना पाठिंबा

जेनजीचं आंदोलन यशस्वी ठरलं आणि अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर अपराजिता सांरगी यांनी पोस्ट करत प्रधानांना पाठिंबा दर्शवला होता. “श्री @dpradhanbjp यांनी आज राजीनामा दिला आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यासाठी मोठे धैर्य लागते. या कठीण काळात मी त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. भगवान जगन्नाथ यांची कृपा त्यांच्यावर सदैव राहो” असं त्यांनी म्हटलं. मात्र खासदार अपराजिता सारंगी आणि त्यांची कन्या अर्चिता यांनी या प्रकरणात घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे ओडिशातील अनेक भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली.

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • देशावर नवे संकट! थेट मंत्री आयसीयूमध्ये, H1N1 फ्लूची नेमकी लक्षणे काय?
  • मोठी बातमी! राज्यात घडामोडींना वेग, विरोधी पक्षाचे खासदार घेणार फडणवीसांची भेट
  • Egg Price Hike : आता खाण्याचेही वांदे… साखर, कांद्यानंतर अंड्याचे भाव वाढले, झटक्यात इतके झाले भाव?
  • याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
  • मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू… रूपाली चाकणकर यांच्यावर भडकल्या या नेत्या..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in