• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? आज घरुन निघण्यापूर्वी तुमच्या शहराचे दर नक्की तपासा!

May 24, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही महिन्यांपासून इराण, इराक आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याच कारणामुळे भारतात सर्वत्र पेट्रोल-डिझेलसह इंधन दरवाढ होताना दिसत आहे. आता कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य नोकरदार आणि वाहनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. आज इंधनाचे दर पूर्णपणे स्थिर आहेत. मात्र, जागतिक बाजारपेठेतील घडामोडी पाहता हा दिलासा तात्पुरता असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांत सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. त्याआधीच हैराण झालेल्या जनतेला आज जरी दिलासा मिळाला असला, तरी आगामी काळात इंधन आणखी महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या देशातील सरकारी तेल कंपन्या (जसे की इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम) मोठ्या आर्थिक संकटात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. मात्र त्या तुलनेत भारतात पेट्रोल-डिझेलचे दर खूप जास्त वाढवलेले नाहीत. कंपन्यांना त्यांचा प्रत्यक्ष खर्च निघेल, एवढ्या किंमतीत इंधन विकता येत नसल्याने त्यांना रोज मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोलच्या दरात ८७ पैशांनी आणि डिझेलच्या दरात ९१ पैशांनी वाढ करण्यात आली होती. तसेच काही दिवसांपूर्वी इंधन थेट ३ रुपयांनी महागले होते. या दरवाढीमुळे कंपन्यांचा तोटा थोडा कमी झाला आहे, तरीही त्यांना रोज ७५० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा सहन करावा लागत आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, हा रोजचा ७५० कोटींचा तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्या येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवू शकतात.

पुन्हा दरवाढ झाली तर काय होणार?

जर तेल कंपन्यांनी त्यांचा तोटा भरून काढण्यासाठी पुन्हा किमती वाढवल्या, तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. डिझेल महागल्यामुळे ट्रॅक आणि वाहतुकीचा खर्च वाढेल, ज्यामुळे भाजीपाला, दूध आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू अधिक महाग होऊ शकतात.

तुमच्या शहरातील इंधनाचे दर काय आहेत?

घरून बाहेर पडण्यापूर्वी आज २२ मे रोजी देशातील आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचा भाव काय आहे, ते एकदा पाहा.

शहर पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
मुंबई (Mumbai) ₹ १०७.५९ ₹ ९४.०८
पुणे (Pune) ₹ १०८.९२ ₹ ९५.४२
नवी दिल्ली (New Delhi) ₹ ९८.६४ ₹ ९१.५८
कोलकाता (Kolkata) ₹ १०९.७० ₹ ९६.०७
चेन्नई (Chennai) ₹ १०४.९२ ₹ ९६.५४
बेंगळुरू (Bangalore) ₹ १०७.१६ ₹ ९५.०४

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!
  • Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : ‘2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी’
  • 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in