• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पूर्व पत्नी दलजीत कौरशीच पुन्हा लग्न करणार शालीन? व्हिडीओवर सोडलं अखेर मौन

June 11, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शालीन भनोट त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच तो इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचला होता. यावेळी त्याने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. त्याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत एका पापाराझी अकाऊंटवर थेट त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोठा दावा करण्यात आला. शालीन पुन्हा त्याच्या पूर्व पत्नीशी लग्न करणार असल्याचं या व्हिडीओवर लिहिण्यात आलं होतं. हे पाहून शालीनचा संताप अनावर झाला असून त्याने त्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्येच प्रत्युत्तर दिलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने संबंधित अकाऊंटविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे.

शालीन भनोटने 2009 मध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरशी लग्न केलं होतं. ‘कुलवधू’ या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. या दोघांना जेडन नावाचा एक मुलगासुद्धा आहे. मात्र लग्नाच्या काही वर्षांतच त्यांच्यात खटके उडू लागले आणि अखेर 2015 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. शालीनला घटस्फोट दिल्यानंतर दलजीतने निखिल पटेल नावाच्या बिझनेसमनशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र हे लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. आता शालीन पुन्हा दलजीतशी लग्न करणार असल्याचा हा व्हिडीओ पाहताच त्याचा पारा चढला.

शालीनची कमेंट-

या व्हिडीओच्या कमेंट बॉक्स मध्ये शालीनने लिहिलं, ‘ही बातमी पूर्णपणे खोटी आणि बनावट आहे. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याशी संबंधित कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहण्याची जबाबदारी कोणत्याही मीडिया पेजची असते. फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खोट्या बातम्या पसरवणं हे अत्यंत बेजबाबदारपणाचं आहे. मीडिया प्लॅटफॉर्म्सनी अशा गोष्टींची सत्यता पडताळून पाहिल्यानंतरच त्या प्रसिद्ध कराव्यात.’

शालीनने संबंधित पेजला ती पोस्ट तात्काळ काढून टाकण्याचा आणि जाहीरपणे माफी मागण्याचा इशाराही दिला आहे. ‘ही पोस्ट तात्काळ डिलीट करा आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल तुमच्या पेजवर अधिकृत माफीनामा प्रसिद्ध करा. हा एक इशारा समजा. जर तुम्ही असं केलं नाही तर मला तुमच्यावर आणि तुमच्या कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी लागेल’, असं त्याने पुढे लिहिलं. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया देत त्याला पाठिंबा दर्शविला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अलिकडच्या काळात फुटतायत आमदार, खासदार..; मराठी अभिनेत्याचा पत्नीसाठी भन्नाट उखाणा
  • बीडच्या खासदार पुत्राला होणार अटक? थेट विलास घुले खून प्रकरणात पोलिसांनी..
  • वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचं जीवन मोठ्या पडद्यावर आलं तेव्हा… तणावपूर्ण वातावरणात सिनेमाचा रोमँटिक सीन शूट आणि…
  • 8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगावर मोठी अपडेट; मुंबई-पुण्यातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार?
  • अहंकारामुळे अजय देवगण-करिश्मा कपूरचा हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही, निर्मात्यांचं झालं मोठं नुकसान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in