• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुन्हा पाऊस आला रे, पुणे ते सातारा धो-धो बरसणार; नदी नाले तुडुंब भरणार; हवामानाचा नवा अंदाज काय?

July 26, 2026 by admin Leave a Comment


राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याचेही समोर आले आहे. अशातच आता हवामान विभागाने मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भातील जिल्हांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यातील काही भागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या राज्याच्या कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्याच्या या भागाला मुसळधार पावसाचा कहर

हवामान विभागाने 27 जुलैसाठी पावसाचा अंदाज जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे आणि साताऱ्यासह कोल्हापूरला उद्या मुसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांना उद्या पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. थासकरून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या राज्यांनाही मुसळधार पावसाचा अलर्ट

उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याच्या क्षेत्रामुळे 26 आणि 27 जुलै रोजी ओडिशामध्ये, तसेच 27 जुलै रोजी छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय 26 आणि 27 जुलै रोजी गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्येही अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 28 ते 31 जुलै दरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पंजाब येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 28 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत पश्चिम उत्तर प्रदेशात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस होऊ शकतो. 29 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत पूर्व राजस्थानातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यांची 85% दृष्टी गेली, तब्येत बिघडली… इम्रान खान यांची तुरुंगात बिकट अवस्था, मुलांनी केला खुलासा
  • आंतरजातीय विवाह करणारे होणार लखपती, सरकारची मोठी घोषणा, मिळणार इतके पैसे
  • MPSC Paper Leak : लव्ह स्टोरीमुळे फुटला MPSC चा पेपर, तपासातून धक्कादायक माहिती समोर
  • Khavdya Donger : खवड्या डोंगर प्रकरणात हैराण करणारा ट्विस्ट, कुणालला जीव द्यायचाच नव्हता? मोठं कारण आलं समोर
  • मुंबईकरांसाठी विशेष बातमी! मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून सलग 15 दिवसांचा ब्लॉक, सर्वात मोठा बदल घडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in