• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुण्यात पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधन? गाड्या अचानक पडताहेत बंद; ग्राहकांचा मनस्ताप

July 27, 2026 by admin Leave a Comment


देशभरातील नागरिक इथेनॉल मिश्रित पेट्रोलमळे त्रस्त झाले आहेत. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांवर परिणाम होत असल्याचा दावा काही चालकांकडून केला जात आहे. तर सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. इथेनॉलमुळे इंजिनवर परिणाम होत असल्याचा दावा केला जात असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता पंपावर पाणीमिश्रीत पेट्रोल मिळत असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. पुण्यातील राजगुरुनगरच्या एका पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित इंधन मिळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकारामुळे ग्राहकांसहित पंपमालकाचंही टेन्शन वाढलं आहे.

पेट्रोलमध्ये पाणी मिश्रीत होते कसे?

मीडिया रिपोर्टनुसार, इथेनॉलमध्ये पाणी शोषून घेण्याचं वैशिष्ट्य असतं. परंतु ही बाब पंप चालक आणि वाहनाधकांरासाठी अडचणीची ठरत असल्याचं बोलले जात आहे. पेट्रोल पंपाच्या खालीच साठवणुकीच्या टाक्यांची रचना केलेली असते. परंतु अनेक पंप मालकांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोल साठवण्यासाठी रचना केलेली नाही. दुसरीकडे पेट्रोल पंप मालक देखील E20 वरून चिंतेत आहेत. पंपावरील फ्युल डिस्पेनरमधून E20 च्या जागी दूषित पाणी येत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप मालकांची चिंता वाढली आहे. परंतु पेट्रोल पंप मालक यावर उघडपणे भाष्य करताना दिसत नाहीत.

तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, पेट्रोल पंपाजवळ जमिनीच्या खाली पेट्रोल साठवण्यात येते. पावसाच्या दिवसात या टाकीत वाढलेली आर्द्रता, टँकरमधील इंधनात मिसळणारे पाणी यामळे या पेट्रोलमध्ये काही प्रमाणात पाणी मिसळते. जमिनीखालील टाक्यांमध्ये E20 साठ्यात पाण्याचे प्रमाण 0.5 टक्क्यांहून अधिक झाल्यास त्याचे प्रमाण पाहायला मिळतो . त्यामुळे इथेनॉल हे पाण्यासोबत मिसळतो. त्यात इथेनॉलमध्ये पाणी शोषून घेण्याचे वैशिष्ट्ये असते. त्यामुळे पाणी आणि इथेनॉलचं मिश्रण टाकीच्या खाली जाऊन बसल्याने पेट्रोल वर पाहायला मिळते.

‘टाक्यांच्या तळातून इंधन वर खेचले जाते. त्यामुळे काही वाहनांत E20 च्या जागी पाण्याचं मिश्रण जाण्याची शक्यता असते. यामुळे वाहनधारकांसहित पंप मालकांची चिंता वाढली आहे, असं एकाने पंप मालकाने दावा केला आहे.

प्रकार कसा उघडकीस आला?

पुण्यात पाणीमिश्रीत इंधनामुळे अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करवा लागतोय.
बॉटलमध्ये पेट्रोल घेतल्यानंतर यामध्ये पाणीमिश्रित असल्याची बाब समोर आली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?
  • CJP आंदोलनात बेधडक पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रियाचं भवितव्य जनतेच्या हातात, सलमान खानने घेतला पुढाकार
  • मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
  • साखर कडू झाल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचे दर दुप्पट, तर लसूण 200 रुपयांवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in