• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पुढील 3 तास राज्यावर संकट, धो धो मुसळधार पाऊस, 24, 25, 26, 27 तारखेला थेट इशारा..

June 24, 2026 by admin Leave a Comment


मुंबईसह राज्यात मॉन्सून दाखल झाला. जोरदार पाऊस सर्वदूर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मॉन्सून राज्यात दाखल झाला. दमदार पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे. 24, 25, 26, 27, 28 पर्यंत राज्यात असाच धो धो पाऊस राहण्याचा अंदाज आहे. अनेक भागात रात्रभर पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर पाऊस होता. अनेक भागात पाणी साचले आहे. कुर्ला, किंग सर्कल आणि सायनमध्ये पाणी साचले. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला. मॉन्सून राज्यभरात पसरला आहे. पुढील 3 तास अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. या पावसामुळे रस्ते जलमय झाले. पुढील दोन ते तीन दिवस अरबी समुद्र, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशच्या दिशेने मॉन्सून पुढे सरकत आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस 

मुंबई उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. काल संध्याकाळपासून कांदिवली, मालाडसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कांदिवलीतील गणेश नगर आणि मालाड पूर्व येथील कुरार गावातील कोंकणी पाडा या भागात पावसाचे पाणी साचले आहे. याशिवाय इतरही अनेक सखल भागात जलजमावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात मॉन्सूनची जोरदार हजेरी 

काल संध्याकाळपासून पाऊस थांबलेला नाही. अधूनमधून जोरदार सरी येत आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी आणखी वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या उपनगरात पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाची हजेरी

पुढील काही तासात धो धो पाऊस

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची सुरुवात. काल काही भागांत पावसाचा जोर वाढल्याने पाणी साचल्याच्या घटना. मात्र काही वेळातच पावसाचा वेग कमी होताच साचलेल्या पाण्याचा झाला निचरा. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, वातावरणात गारवा तर दुसरीकडे पावसामुळे अनेक ठिकाणी महावितरणाची खांब पडल्याने बत्ती गुल झाली. राज्याभरात पाऊस बघायला मिळत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय
  • Mars Transit 2026 : मंगळाचा नक्षत्र बदल ठरणार लाभदायक; 2 सप्टेंबरपासून ‘या’ 4 राशींना अच्छे दिन ?
  • नवी मुंबईत दूध भेसळीचा पर्दाफाश, भेसळयुक्त दूध जप्त

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in