• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पिंपरी-चिंचवडमध्ये फुगेवाडीत एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यूने खळबळ; विषारी दारु की अन्य कारण ?

May 28, 2026 by admin Leave a Comment


Pugewadi Death Case : पिंपरी- चिंचवड येथील फुगेवाडी परिसरात एकाच भागात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. फुगेवाडीतील गावच्या आझाद चौकात एका फलकावर या मृतांची नावे लिहिल्यानंतर परिसरातील लोकांना या घटनेसंदर्भात माहिती कळाली आणि संपूर्ण परिसरात भीती पसरली. हे मृत्यू अवैध हातभट्टीच्या दारुमुळे झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

हातभट्टीच्या दारूने मृत्यू ?

एकाच वेळी अशा प्रकारे पाच जणांचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर फुगेवाडीत विविध तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत. गावाच्या आझाद चौक आणि परिसरात दोन ठिकाणी हातभट्टीची दारु आणि गावठी दारुचे अड्डे सुरु असल्याची चर्चा आहे.यामुळे या पाच नागरिकांचा मृत्यू याच अड्ड्यावरील विषारी दारुमुळे झाला असावा संशय आहे. या संदर्भात हातभट्टी दारुच्या अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून या प्रकरणात कारवाईची मागणी होत आहे.

पोलिसांचा प्राथमिक तपासात मोठा खुलासा

या प्रकरणाचे गांभीर्य पाहून या प्रकरणाचा दापोडी पोलिसांनी (Dapodi Police) तपास सुरू केला आहे. पोलिसांनी केलेल्या या तपासानंतर या प्रकरणातील नागरिकांचे सर्व दावे पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानंतर या पाचही घटनांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटना वेगवेगळ्या आणि स्वतंत्र असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पाच मृतांपैकी पैकी चार जणांना दारुचे व्यसन नव्हते तसेच त्यांच्या नातेवाईकांनी या संदर्भात कोणतीही तक्रार केली नसल्याचे दापोडी पोलिसांनी म्हटले आहे.

मृतांची नावे आणि पोलिसांची माहिती

दापोडी पोलिसांच्या माहितीनुसार, मृत पावलेल्या पाचही नागरिकांची पार्श्वभूमी आणि मृत्यूचे प्राथमिक कारण जाहीर करण्यात आले आहे.

पांडुरंग फुगे (वय ५७) : यांचा मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक (Natural Death) कारणाने झाला आहे.

विजय राठोड (वय ३१) आणि राजेंद्र राठोड (वय ३४ ) : या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack) झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.

राजेंद्र राजपूत (वय५१ ) : हे घरात असताना अचानक बाथरूममध्ये चक्कर येऊन पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अकबर पठाण (वय ५२ ) : हे गेल्या १५ वर्षांपासून प्रचंड दारु पित (Alcohol Addiction) होते. त्यांचा मृत्यू अतिमद्यप्राशनाने किंवा इतर आजाराने झाल्याची शक्यता आहे.

 

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in