• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पावसाळ्यात ही झाडे घराजवळ असतील तर साप आलाच समजा, पहिले झाड तर सर्वात आवडते ठिकाण

June 7, 2026 by admin Leave a Comment


राज्यासह देशाच्या अनेक भागात पावसाला सुरूवात झाली आहे. आगामी काळात जसजसा पावसाचा जोर वाढेल तसतसे साप आपल्या बिळांतून बाहेर पडू लागतील, याचे कारण म्हणजे त्यांच्या बिळांमध्ये पाणी साचते. त्यामुळे पावसाळ्यात साप लपण्यासाठी नवीन सुरक्षित ठिकाण शोधू लागतात आणि मानवी वस्तीत शिरतात. अनेक विषारी साप घरातील कोपरे, भेगा, बाग, झाडे-झुडपे, गार्डन परिसरात लपून बसू शकतात. घराभोवती असलेली दाट झुडपे, लाकडांचे ढीग, कचरा सापांना लपण्यासाठी योग्य वातावरण देतात. तुमच्या घराभोवती खालील झाडे असतील तर तुमच्या घराच्या आसपास साप आढळू शकतात. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोणत्या झाडांभोवती साप जास्त लपतात?

  1. बांबूच्या दाट झुडपांमध्ये साप जास्त लपतात. घराजवळ बांबूची झाडे असतील तर त्यांच्या बुडात सापांना लपण्यासाठी चांगली जागा मिळते. त्यामुळे अशा जागांची नियमित तपासणी करावी.
  2. मेहंदी, मोरपंखी, ड्युरांटा आणि दाट कुंपणासारख्या झुडपांच्या खाली साप लपू शकतात. घराजवळ झुडपे असतील तर विशेषतः पावसाळ्यात त्यांची छाटणी करणे गरजेचे आहे.
  3. केळीच्या झाडांभोवती ओलावा जास्त असतो. सुकलेल्या पानांचा ढीग सापांसाठी लपण्याची जागा बनतो. त्यामुळे अशी पाने बागेत किंवा अंगणात साचू देऊ नका.
  4. खजूर आणि पाम जातीच्या झाडांखाली पडलेल्या सुक्या पानांमध्येही साप लपू शकतात.

ही झाडे तोडून टाकावीत का?

वरील झाडांच्या आसपास साप आढळण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही झाडे तोडून टाकावीत का? मात्र झाडे तोडणे हा योग्य उपाय नाही. त्याऐवजी झाडांभोवतीचे गवत नियमित कापावे. सुकलेली पाने आणि लाकडे दूर हटवावी. झुडपांची वेळोवेळी छाटणी करावी. घराजवळ कचरा साचू देऊ नये. उंदरांची संख्या वाढल्यास त्यावर नियंत्रण ठेवावे यामुळे साप घराजवळ आढणने कमी होईल.

घराभोवती कोणत्या गोष्टींमुळे साप येण्याचा धोका वाढतो?

तुमच्या घराजवळ लाकूड आणि विटांचे ढीग, दाट झुडपे असतील तर सापांचा वावर वाढू शकतो. तसेच बागेतील गवत खूप दिवस कापले नाही तरीही साप आढळू शकतात. तसेच घराजवळ बंद स्टोअररूम, भेगा किंवा छिद्रे आणि उंदीर, खारी, बेडूक असतील साप याकडे आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात सापांचा त्रास टाळायचा असेल तर स्वच्छतेला महत्त्व द्या.

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in