
पावसाळ्यात मिठाच्या डब्यात मिठ सचतंय… यामागील मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेत होणारी वाढ. मिठाचे कण हवेतील ओलावा सहजपणे शोषून घेतात. त्यामुळे ते लवकर दमट होतात. ही समस्या टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.
मिठाच्या डब्यात तांदळाचे काही दाणे ठेवा. तांदूळ अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. यामुळे मीठ जास्त काळ कोरडे राहण्यास मदत होते. कॉफी बीन्स किंवा सुके राजमा ओलावा कमी करण्यास मदत करतात.
लवंग ओलावा कमी करण्यास मदत करतात. पण त्यांचा सुगंध मिठात उतरू नये म्हणून, त्यांना कापडात गुंडाळून डब्यात ठेवा. कपड्यात गुंडाळल्याने मिठाला लवंगाचा वास येणार नाही.
याव्यतिरिक्त, मिठाची भांडी नेहमी कोरड्या, हवेशीर आणि थंड जागी ठेवावीत. चांगल्या प्रतीचे भांडे वापरा. उघडल्यानंतर ते लगेच बंद करा. तसेच, मीठ काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा.
हे सोपे घरगुती उपाय अवलंबल्याने, पावसाळ्यातही मीठ आणि साखर बराच काळ कोरडे राहतील आणि तुम्ही स्वयंपाकघरातील ही सामान्य समस्या सहज टाळू शकाल.




Leave a Reply