• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पावसाळ्यात तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहऱ्याला लावा ‘या’ घरगुती गोष्टी

June 19, 2026 by admin Leave a Comment


तेलकट त्वचा असलेल्यांना पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याची गरज असते. पावसाळ्यात उष्णतेपासून आराम मिळत असला तरी, या दिवसांमध्ये त्वचा तेलकट वाटू शकते. तुमची ही त्वचा तेलकट आहे तर या ऋतूत त्वचेची काळजी घेण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा. चला तर मग आजच्या लेखात आपण कोणते उपाय तेलकट त्वचेसाठी उपयुक्त आहेत ते जाणून घेऊयात.

आपली त्वचा तेलकट का होते ?

जेव्हा आपल्या त्वचेतील सेबमच्या निर्मितीमध्ये अडथळा येतो, तेव्हा अतिरिक्त तेल त्वचेवर जमा होऊ लागते. पावसाळ्यातील दमट हवामानामुळे, सेबम तयार करणाऱ्या तेल ग्रंथी (sebaceous glands) सक्रिय होतात. त्यामुळे या ऋतूत अतिरिक्त तेलाची समस्या आपल्या त्वचेला त्रास देते.

तुमच्या तेलकट त्वचेची या काही घरगूती उपायांनी काळजी घ्या

मुलतानी मातीचा वापर

तुम्ही तुमच्या त्वचेला मुलतानी मातीची पेस्ट लावू शकता. तज्ञांच्या मते, ही पेस्ट त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते. तुम्ही त्यात गुलाबपाणी देखील मिसळू शकता. ज्यामुळे त्वचा मऊ राहते.

चंदन पावडरचा वापर

तेलकट त्वचेची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी चंदन पावडरचा वापर देखील केला जाऊ शकतो. यासाठी दोन चमचे कच्च्या दुधात चंदन पावडर मिक्स करा. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देखील मिळेल.

बेसनचा घरगुती उपाय –

ज्यांना पावसाळ्यात तेलकट त्वचेचा त्रास होतो, त्यांनी बेसनचा हा घरगुती उपाय करून पाहावा. त्यात नैसर्गिकरित्या तेल शोषून घेण्याचा गुणधर्म असतो. यासाठी एका भांड्यात तीन मोठे चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि तीन मोठे चमचे दही घेऊन सर्व मिश्रण एकत्र मिक्स करा. तेल नियंत्रित करण्यासोबतच या उपायामुळे काळे डाग देखील कमी होतील.

कोरफडीची मदत घ्या –

कोरफड ही भारतीयांमध्ये एक आवडती अष्टपैलू वनस्पती मानली जाते, कारण ती त्वचा, केस आणि शरीरासाठी अनेक फायदे देते. सकाळी अंघोळीच्या 10 मिनिटे आधी चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा. सुकल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामध्ये त्वचेला आतून दुरुस्त करण्यास मदत करणारे मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत.

यामुळे पावसाळ्यात तुम्ही या काही घरगूती उपायांचा अवलंब केल्यास तेलकट त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळेल. तसेच कोणताही उपाय करण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in