• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पावसाळ्यात तुमचा इन्व्हर्टर सुरक्षित ठेवण्यासाठी या सोप्या टिप्स करा फॉलो

July 7, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रभर पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळतेय. त्यातच पावसाळ्याच्या दिवसात इनव्हर्टरचा वापर जास्त हाेताे. कारण सतत जाणाऱ्या लाईटमुळे अनेकांकडे इनव्हर्टर हा असतोच. तर पावसाळ्यात इन्व्हर्टर आणि त्याच्या बॅटरीसाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. या दिवसांमध्ये वातावरणात आर्द्रता जास्त असते आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे इन्व्हर्टरवर अतिरिक्त ताण येतो. इनव्हर्टर व बॅटरीची योग्य काळजी न घेतल्यास, बॅटरी बॅकअप कमी होऊ शकतो आणि शॉर्ट सर्किट किंवा स्पार्किंगसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. चला तर मग पावसाळ्याच्या दिवसात इनव्हर्टर सुरक्षित कशाप्रकारे ठेवाल ते जाणून घेऊयात.

पावसाळ्यात तुमचा इन्व्हर्टर सुरक्षित ठेवण्यासाठी तो योग्य ठिकाणी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इन्व्हर्टर आणि बॅटरी हे ओलावा किंवा दमटपणापासून दूर असलेल्या ठिकाणी ठेवावी. बॅटरी नेहमी कोरड्या, हवेशीर जागेत ठेवावी आणि ती थेट जमिनीवर ठेवण्याऐवजी थोड्या उंच ठिकाणी ठेवणे उत्तम. याव्यतिरिक्त, हवेचे योग्य व्हेंटिलेशन होण्यासाठी आणि उष्णता बाहेर जाण्यासाठी इन्व्हर्टर भिंतीला लागून ठेवू नये.

बॅटरीमधील पाण्याची पातळी तपासत राहणे

याव्यतिरिक्त इनव्हर्टरच्या बॅटरीची नियमित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दर 45 ते 60 दिवसांनी बॅटरीमधील पाण्याची पातळी तपासा. इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी झाल्यास, फक्त डिस्टिल्ड वॉटरच टाकावे. नळाचे पाणी किंवा आरओ वॉटर वापरू नये, कारण त्यातील खनिजे बॅटरीला नुकसान पोहोचवू शकतात. शिवाय बॅटरीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी भरल्यास ॲसिड बाहेर पडू शकते, ज्यामुळे बॅटरी खराब होऊ शकते.

ओला कपडा वापरणे टाळा

पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे बॅटरीच्या टर्मिनल्सवर गंज चढणे किंवा पांढरट-हिरवा थर जमा होणे ही एक सामान्य समस्या आहे. असे लक्षात आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर टर्मिनल्स स्वच्छ करून घेणे महत्त्वाचे आहे. याव्यतिरिक्त इन्व्हर्टरचा बाह्य भाग नियमितपणे कोरड्या, स्वच्छ कापडाने स्वच्छ केला पाहिजे. ओल्या कापडाचा वापर टाळा, कारण त्यामुळे आर्द्रता वाढू शकते.

इन्व्हर्टरवर अतिरिक्त कसा कमी करता येईल ते पहा

याव्यतिरिक्त पावसाळ्याच्या दिवसात इन्व्हर्टरवर अतिरिक्त भार टाळावा. वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे लोकं अनेकदा इन्व्हर्टरवरील उपकरणांचा अतिवापर करतात, ज्यामुळे बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. विशेषतः एअर कंडिशनर, हीटर, गिझर आणि मायक्रोवेव्ह यांसारखी जास्त वीज वापरणारी उपकरणे इन्व्हर्टरवर चालवू नयेत. याचा परिणाम केवळ बॅटरीच्या क्षमतेवरच होत नाही, तर बॅटरीचे आयुष्यही कमी होते. योग्य काळजी आणि खबरदारी घेतल्यास तुम्ही पावसाळ्यात तुमचा इन्व्हर्टर दीर्घकाळ सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने चालू ठेवू शकता.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in